कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला मुलगा, मदतीसाठी धावली आई; पण कोणीही नाही बचावलं!

कुत्र्याला वाचवण्यासाठी गेला मुलगा, मदतीसाठी धावली आई; पण कोणीही नाही बचावलं!

वडिलदेखील पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनीही विद्यूत प्रवाहाचा झटका बसला. यानंतर घरात आरडाओरडा झाल्याने प्रवीण मेश्राम नामक व्यक्ती मदतीला धावला असता त्याने समय सुचकता दाखवत विद्युत पुरवठा खंडित करून घरात प्रवेश केला.

  • Share this:

वर्धा, 06 सप्टेंबर : मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलाचाही मृत्यू झाल्याचा एक धक्कादायक प्रकार वर्ध्यामध्ये समोर आला आहे.  वर्ध्याच्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतअंतर्गत हिंदनगर परिसरात विद्युत प्रवाहाच्या धक्का लागल्याने मुलाल वाचवला गेलेल्या आईचा मृत्यू, तसंच उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे यामध्ये एका कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दिपाली मेश्राम वय 40 वर्ष, रोहित मेश्राम वय 23 वर्ष अशी मृतकांची नावे आहे. ते झालं असं की, रोहित हा कपड्यांना इस्त्री करत होता. त्यावेळी त्यांच्या पाळीव कुत्र्याला शॉक लागला. त्याला वाचवण्यासाठी रोहित धावला आणि रोहितलाही शॉक लागला. रोहितला शॉक लागल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याची आई दिपाली धावत आली. या धक्कादायक घटनेमध्ये कुत्र्यासकट मायलेकांचाही मृत्यू झाला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलदेखील पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनीही विद्यूत प्रवाहाचा झटका बसला. यानंतर घरात आरडाओरडा झाल्याने प्रवीण मेश्राम नामक व्यक्ती मदतीला धावला असता त्याने समय सुचकता दाखवत विद्युत पुरवठा खंडित करून घरात प्रवेश केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मायलेकांचा मृत्यू झाला असून वडिलांची म्हणजे सिद्धार्थ मेश्राम यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या - MRI करताना 8 वर्षाच्या मुलीचा झाला जागीच मृत्यू, कारण...

दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडत असताना शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच विद्यूत प्रवाह खंडित केल्यामुळे सुदैवाने सिद्धार्थ मिश्राम यांचा जीव वाचल्याचं सांगण्यात येत आहे. विद्यूत प्रवाह खंडीत झाल्यानंतर शेजाऱ्यांनी तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान, मायलेकांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - स्पा सेंटरमध्ये सुरू होतं SEX रॅकेट, लाईव्ह रेडचा धक्कादायक VIDEO

या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद वर्धा पोलीस स्थानकात करण्यात आली असून मायलेकांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पण एकाच वेळी पत्नी आणि मुलाला गमावल्यामुळे सिद्धार्थ मिश्राम यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

VIDEO : रस्त्यावर चालताना मोकाट वळूने महिलेला उचलून फेकलं, लोकांची धावपळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading