पोलीस अधिकाऱ्याने केलं फिल्मी प्री-वेडिंग शूट, Romantic फोटोंची जगभर चर्चा

असंच एक भन्नाट प्री-वेडिंग शूट एका पोलीस अधिकाऱ्याने केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 09:48 PM IST

पोलीस अधिकाऱ्याने केलं फिल्मी प्री-वेडिंग शूट, Romantic फोटोंची जगभर चर्चा

हल्ली लग्न समारंभ म्हटलं की प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड आहे. प्री-वेडिंग शूटसाठी हल्ली मागण्याही वाढल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक प्री-वेडिंग शूट आपल्याला पाहायला मिळतात.

हल्ली लग्न समारंभ म्हटलं की प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेंड आहे. प्री-वेडिंग शूटसाठी हल्ली मागण्याही वाढल्या आहेत. सोशल मीडियावर अनेक प्री-वेडिंग शूट आपल्याला पाहायला मिळतात.

असंच एक भन्नाट प्री-वेडिंग शूट एका पोलीस अधिकाऱ्याने केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असंच एक भन्नाट प्री-वेडिंग शूट एका पोलीस अधिकाऱ्याने केलं आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उदयपुरातल्या कोटडा ठाणेदाराचा प्री-वेडिंग शूट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

खास गोष्ट म्हणजे आधी हा व्हिडिओ पोलीस कर्मचार्‍यांमध्ये चर्चेचा विषय होता. पण जेव्हा 20 ऑगस्ट रोजी आयजी कायदा व सुव्यवस्थेने आदेश जारी केला तेव्हा हा सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला.

खरंतर कोटडा पोलीस स्थानकातील धनपत सिंह यांनी दोन महिन्यांआधी होणाऱ्या पत्नीसोबत प्री-वेडिंग शूट केलं.

Loading...

यामध्ये त्यांनी सगळ्यात हटके स्टाईल आणि थिम वापरली आहे.

विना हेल्मेट जाणाऱ्या मुलीला धनपत आडवतात आणि तिच्याच प्रेमात पडतात असं या व्हिडिओमधून त्यांनी दाखवलं आहे. त्यांच्या या व्हिडिओची आणि फोटोंची जगभर चर्चा होत आहे.

हेल्मेट न घालता जाणाऱ्या मुलीला धनपत थांबवतात आणि तिथून त्यांच्या प्रेमाला सुरुवात होते.

या व्हिड़िओमध्ये दोघेही खूप रोमँटिक दिसल असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी पकडल्यानंतर मुलगी त्यांना अगदी प्रेमाने पैसे देते आणि धनपत तिच्या याच अदांवर फिदा होतो असं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे.

या सगळ्यात तरुणी जाताना त्यांचं पाकिट चोरते आणि ते परत देण्यासाठी त्यांना परत भेटते.

पण पोलिसांच्या वेशात असा व्हिडिओ शूट केल्यामुळे त्यांच्यावर आक्षेपही घेण्यात आला आहे.

20 ऑगस्ट रोजी कायदा व सुव्यवस्थेचे पोलिस महानिरीक्षक हवसिंह घुमरिया यांनी सर्व एसपी आणि पोलिस उपायुक्त यांना आदेश देऊन लग्नापूर्वीच्या या शूटला वाईट आणि चुकीचं म्हटलं आहे.

चितोगडच्या मण्डफियाच्या पोलीस कर्मचार्‍यांनी या प्री-वेडिंग शूटला विरोध केला आहे. हे पोलिस खात्यासाठी दुर्दैवी असल्य़ाचं त्यांनी म्हटलं आहे. तर यापुढे कोणत्याही शूटमध्ये पोलिसांच्या वर्दीचा वापर होऊ नये असे आदेश काढ़ण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2019 09:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...