अमरेली राजुला हायवेवर 12 सिंहांचा ठिय्या!

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2017 04:55 PM IST

अमरेली राजुला हायवेवर 12 सिंहांचा ठिय्या!

16  एप्रिल : आपल्या मागण्यांसाठी अनेकांना तुम्ही रास्तारोको करताना पाहिलं असेल... मात्र, गुजरातमधील अमरेली राजुला महामार्गावर काल रात्री एक अनअपेक्षित घटना घडली. कारण या महामार्गावर चक्‍क सिंहाच्या कुटुबांने रास्तारोको केला होता.  त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अमरेली राजुला महामार्गावर शनिवारी रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे 12 सिंहांनी ठाण मांडलं आणि बघता-बघता महामार्गावरच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या.

Loading...

रस्त्याच्या मध्यभागीच हे सिंह बराच वेळ असल्याने तब्बल 20 मिनिटं या मार्गावरची वाहतूक बंद होती. महामार्गावर अडकलेल्या काही लोकांनीच हा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2017 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...