कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध, असा बोर्ड लावणाऱ्या मुंबईतील डॉक्टरवर गुन्हा

कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध, असा बोर्ड लावणाऱ्या मुंबईतील डॉक्टरवर गुन्हा

'हमारे यहाँ कोरोना वॉयरस का दवा पिलाया जाता है पर डोस 100 रुपये' अशी जाहिरात करण्यात केली होती.

  • Share this:

मुंबई,19 मार्च: मुंबईसह पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यात कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतीही लस नसताना अफवा अर्थात चुकीची माहिती पसरवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस उपलब्ध असल्याचे सांगणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा (पूर्वे) येथील संतोष भुवन येथे कोरोना लस उपलब्ध असल्याचा बोर्ड लावणाऱ्या डॉक्टरवर तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा...इतर देशांच्या तुलनेत भारतात 'कोरोना'चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या

काय आहे प्रकरण?

नालासोपारा(पूर्वे) कडील संतोष भवन येथील ओम साई क्लिनीक येथे डॉ. सुभाषचंद्र यादव (वय-39) यांनी त्यांच्या क्लिनीकवर 'हमारे यहाँ कोरोना वॉयरस का दवा  पिलाया जाता है पर डोस 100 रुपये' अशी जाहिरात करण्यात केली होती. तसेच कोरोना प्रतिबंधक लसचे तीन डोस घ्यावे लागतील, असे छोट्या आकाराचे भित्ती पत्रक चिकटवले होते.

कोरोनाच्या भीतीने नागरिकांची पाचावरधारण बसली असून त्याचा गैरफायदा डॉ. यादव घेत असल्याची खबर तुळींज पोलिसांना मिळताच त्याच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापनअधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा...Coronavirus : पुण्यात उस्फूर्त Lock Down! ओळखू येणार नाहीत इतके मोकळे झाले रस्ते

'गादीवर झोपा, कोरोना पळवा'

दरम्यान, जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलिस ठाण्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा ठाणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बाळसाहेब सर्जेराव डावखर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा...रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या,गाड्यांची उपलब्धता तपासूनच घराबाहेर पडा

अरिहंत मॅट्रेसेसच्या मालकांनी 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात 'arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli (Furniture Market) Bhiwandi या मथळयाखाली जाहिरात प्रसिद्ध केली होती. या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल, असे नागरिकांना आवाहन करून दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिद्ध केली. तसेच सदर मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल, असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरवली.

सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलिस ठाणे येथे भादंवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधी द्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाट करीत आहेत.

First published: March 19, 2020, 3:33 PM IST

ताज्या बातम्या