शेतात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला अजगराच्या पोटात

शेतात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला अजगराच्या पोटात

सालुबीरो गावामध्ये एका अजगराने चक्क माणसाला गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

30 मार्च :  अजगरामध्ये माणसाला गिळण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं, त्याचाच प्रत्यय इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील सालुबीरो गावा आला आहे. सालुबीरो गावामध्ये एका अजगराने चक्क माणसाला गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शेतावर काम करण्यासाठी गेलेला २५ वर्षीय अकबर नावाचा शेतकरी दिवस संपला तरी घरी परतला नव्हता. त्यामुळे घरचे आणि गावकरी काळजीत पडले होते. सगळ्या गावकऱ्यांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न करत असताना गावकऱ्यांना जो प्रकार दिसला तो मात्र कोणाच्याही अंगावर काटा आणणारा होता.

एक अजगर विचित्रपणे सरपटत असल्याचं गावकऱ्यांना दिसलं. त्या अजगराचं पोट इतकं फुगलेलं होतं की पुढे सरकरणंही त्याला जमत नव्हतं. म्हणून गावकऱ्यांनी त्या अजगराचं पोट फाडून बघितलं असता त्यात अकबरचे मृत शरीर दिसलं.

शेतात काम करत असताना अकबरला अजगराने अख्खंच्या अख्खं गिळलं होतं. हे पाहून गावकऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. या प्रकरणानंतर गावात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

अजगरांनी पाळीव प्राण्यांना किंवा जनावरांना गिळल्याचे अनेकदा पाहिले आहे पण माणसाला गिळण्याचा पहिलाच प्रकार असल्याचं गावच्या सरपंचांनी सांगितलं.

दरम्यान, याआधी 2013  मध्ये इंडोनेशियातल्या बाली येथे असाच प्रकार घडला होता. समुद्रकिना-या लगत असलेल्या हॉटेलच्या एका सुरक्षारक्षकाला अजगराने गिळले होते.

First published: March 30, 2017, 3:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading