किरण मोहिते, सातारा
सातारा, 15 ऑगस्ट : देशभरात आज 74 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. परंतु, साताऱ्यात खळबळजनक घटना घडली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका दाम्पत्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण, वेळीच पोलिसांनी धाव घेऊन दोघांना अडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
स्वातंत्रदिनाच्या दिवशी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा दाम्पत्याने प्रयत्न केला. खाजगी बँकेकडून फसवणूक झाल्याच्या प्रकरणी दखल न घेतल्याने या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण, पाहा हे PHOTOS
सातारा जिल्ह्यातील दत्तात्रय महाराज कळंबे सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबीयांची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या दाम्पत्याने या प्रकरणाची तक्रार वेळोवेळी पोलीस स्टेशनला देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदनही दिले मात्र यावरही काहीच पुढे हालचाल न झाल्याने त्यांनी आज स्वातंत्र दिनाच्या दिवशी आत्मदहन करून घेण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक! 45 वर्षीय कोरोना रुग्णानं रुग्णालयात उचललं धक्कादायक पाऊल
दोघांनी सोबत आणलेली पेट्रोलची कॅन अंगावर ओतून घेतली, पण समोरच असलेल्या पोलिसांनी दोघांच्या हातातून कॅन हिसकावून घेतली आणि दोघांना दूर नेले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पोलिसांनी या दोन्ही दाम्पत्याला सध्या ताब्यात घेतले आहे.