Home /News /news /

उल्हासनगरमध्ये इमारतीला लागलेली आग आटोक्यात, जीवितहानी नाही

उल्हासनगरमध्ये इमारतीला लागलेली आग आटोक्यात, जीवितहानी नाही

उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 मध्ये गजबजलेल्या परिसरात आज सकाळी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली होती.

उल्हासनगर, 12 मे : लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे बाजारपेठा बंद आहे. मात्र, अशा परिस्थितीत  उल्हासनगरमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 3 मध्ये गजबजलेल्या परिसरात आज सकाळी एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ईगल कन्स्ट्रक्शनच्या कार्यलयातही  ही आग लागली होती.  आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान आणि पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीने रौद्ररुपधारक केल्यामुळे आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. या दुर्घटनेत तिसरा मजला जळून खाक झाला आहे.  अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळात या आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.  लॉकडाउन असल्यामुळे या इमारतीत कुणीही कर्मचारी हजर नव्हते, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. परंतु, या आगीत ईगल कन्स्ट्रक्शनच्या कार्यलयाचं प्रचंड नुकसान झालं आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ullhasnagar

पुढील बातम्या