धक्कादायक! KISS करण्यासाठी विद्यार्थिनीने दिला नकार, मित्राने जीव घेऊन...

धक्कादायक! KISS करण्यासाठी विद्यार्थिनीने दिला नकार, मित्राने जीव घेऊन...

कॉलेज सुटल्यानंतर घरी परतताना ती आणि तिचा मित्र आडकाठी एका तलावावर बसले होते. त्यावेळी मित्राकडून चुंबनाची मागणी करण्यात आली.

  • Share this:

मध्य प्रदेश, 09 सप्टेंबर : चुंबनासाठी विद्यार्थिनीने नकार दिल्यामुळे मित्राने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकाच कॉलेजमध्ये शिकत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपुरातील बिजापुरी गावात हा खळबळजनक प्रकार घडला आहे. हत्या झालेली विद्यार्थिनी 18 वर्षांची असून ती 12वीत शिकत होती. कॉलेज सुटल्यानंतर घरी परतताना ती आणि तिचा मित्र आडकाठी एका तलावावर बसले होते. त्यावेळी मित्राकडून चुंबनाची मागणी करण्यात आली. विद्यार्थिनीने त्याला विरोध केला. पण तरीही विद्यार्थ्याने तिला चुंबनासाठी जवळ घेतलं. पण विद्यार्थिनीने त्याला दूर ढकललं.

या सगळ्याचा राग आल्यानंतर मित्राने तिला जोरात धक्का दिला. विद्यार्थिनी शेजारच्या दगडावर जाऊन आदळली आणि यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 5 सप्टेंबरला घडली आहे. त्यानंतर घाबरलेल्या आरोपी विद्यार्थ्याने तिचा मृतदेह पाला-पाचोळ्यात लपवून ठेवला आणि पळ काढला. 4 दिवसांनंतर रस्त्याने जाणाऱ्या स्थानिकांनी मृतदेह पाहिला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

इतर बातम्या - क्षणात तुटली साता जन्माची गाठ, पतीला उचलण्यासाठी हात देताच डंपरनं चिरडलं!

पोलिसांनी घटनास्थळावरून विद्यार्थिनीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, पोलीस तपासात संपूर्ण घटना समोर आली. मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या-  पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा

Published by: Renuka Dhaybar
First published: September 9, 2019, 5:04 PM IST

ताज्या बातम्या