केनबरा, 4 ऑगस्ट : ऑस्ट्रेलियात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑस्ट्रेलियाच्या विक्टोरिया राज्यातील सरकारने कडक नियम लागू केले आहेत. नव्या नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये राहण्याचा आदेश असताना त्याचे पालन न केल्यास 3500 डॉलर म्हणजेच अडीच लाखांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. जर दुसऱ्यांना हे नियम तोडण्यात आले तर तुरुंगातही जावं लागू शकतं.
विक्टोरियाचे प्रमुख डेनियल एड्र्युज यांनी सांगितले की आतापर्यंत अशा 800 जणांना क्वारंटाइन नियमांची पायमल्ली केली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार विक्टोरियात संक्रमण पसरण्यामागे अशी मागणे जबाबदार आहेत. दुसरीकडे मेलबोर्नमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने सर्व अनावश्यक दुकानं आणि व्यवसायांना अस्थायी स्वरुपात बंद करण्यात आलं आहे.
#breaking Victoria announces on the spot fines $5,000 - $20,000 penalties for not adhering to isolation orders for COVID-19 patients and those waiting for test results #COVID19
याशिवाय ऑस्ट्रेलियातील अनेक राज्यात नाइट कर्फ्यूदेखील लागू करण्यात आला आहे. सोमवारी विक्टोरियामध्ये कोरोनाचे 4000 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दंड आणि तुरुंगासह अनेक प्रकारचे अनिर्बंध लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मेलबर्न शहरात दिवसा लोकांना घरापासून केवळ 5 किमी परिसरात प्रवास करण्याची परवानगी आहे. पुढील सहा आठवड्यापर्यंत हा कर्फ्यू कायम असणार आहे. रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत केवळ आवश्यक सेवांशीसंबंधित लोक, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना बाहेर निघण्याची परवनागी आहे.