मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जिद्द आणि चिकाटीनं परिस्थितीवर मात, MBBS बनलेला शेतकरीपुत्र प्रवीणची यशोगाथा

जिद्द आणि चिकाटीनं परिस्थितीवर मात, MBBS बनलेला शेतकरीपुत्र प्रवीणची यशोगाथा

success story of akola farmer son शेतकरी कुटुंबात जन्म, वडील शेतकरी आणि घरी जेमतेमच शेती. अशा परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं सर्वावर मात करत प्रवीणनं स्वतःला सिद्ध केलं.

success story of akola farmer son शेतकरी कुटुंबात जन्म, वडील शेतकरी आणि घरी जेमतेमच शेती. अशा परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं सर्वावर मात करत प्रवीणनं स्वतःला सिद्ध केलं.

success story of akola farmer son शेतकरी कुटुंबात जन्म, वडील शेतकरी आणि घरी जेमतेमच शेती. अशा परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं सर्वावर मात करत प्रवीणनं स्वतःला सिद्ध केलं.

अकोला, 07 जून : जिल्ह्याच्या तेल्हारा (Akola Telhara) तालुक्यातील दापुरा (Dapura) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात वाढलेल्या तरुणानं (Farmer Son) डॉक्टर बनत मोठं (Completed MBBS) येश मिळवलंय. जगदिश शालीग्राम सातारकर यांचा मुलगा डॉ.प्रवीण जगदीश सातारकर (Dr. Pravin Satarkar) यानं हा लौकिक मिळवला. शेतकरी कुटुंबात जन्म, वडील शेतकरी आणि घरी जेमतेमच शेती. अशा परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि चिकाटीनं सर्वावर मात करत प्रवीणनं स्वतःला सिद्ध केलं.

(वाचा-VIDEO: मुख्यमंत्री झाल्यावर Uddhav Thackeray पहिल्यांदाच जाणार दिल्लीत)

ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो. सामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलानं हे करून दाखवलं आहे. या मुलाचं नाव आहे डॉ. प्रवीण जगदीश सातारकर. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दापुरा या खेड्यातून येत तो डॉक्टर बनला. प्रवीणचं प्राथमिक शिक्षण गावात जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण गावाजवळच्या मनब्दा श्रीनाथ माध्यमिक विद्यालयात झालेलं. त्यानंतर तळेगाव बाजारला राजीव गांधी महाविद्यालयात पदवीपर्यंत आणि वैद्यकीय शिक्षण डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती इथं झालं.

(वाचा-2021 मध्येच कोरोनासह आणखी एक महाभयंकर संकट; भविष्याबाबत खळबळजनक दावा)

अकोला जिल्ह्यात एका गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलानं जिद्द व परिश्रमाने MBBS ची पदवी घेत परीक्षा उत्तीर्ण होऊन डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे. प्रवीणनं इंग्रजी विषय घेऊन पदवी संपादन केली. शेतीची कामं करून आणि बसनं ये-जा करत अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यानं शिक्षण पूर्ण केलं. पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्णही झाला. आई-वडिलांचं स्वप्न साकार करत गावातला पहिला डॉक्टर होण्याचा मान त्यानं मिळवला.

प्रवीणचे वडील जगदिश सातारकर अल्पशिक्षित शेतकरी असून आई कविता अशिक्षित गृहिणी आहे. त्यांच्याकडं पाच एकर कोरडवाहू शेतजमीन आहे. आई वडिलांसह मोठा भाऊ सचिन सातारकर शेती सांभाळतो. प्रवीणनं यशाचं श्रेय कुटुंबीयांसह गुरुजनांना दिलं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता स्पर्धा परीक्षांमध्ये हिमतीनं पुढं जावं असं आवाहन त्यांनं युवकांना केलं आहे.

First published: