Home /News /news /

अरे बापरे ! आता नवं संकट, Nipah Virus मुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, पुणे NIV ने वृत्ताला दुजोरा दिल्याने देशभरात खळबळ

अरे बापरे ! आता नवं संकट, Nipah Virus मुळे 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, पुणे NIV ने वृत्ताला दुजोरा दिल्याने देशभरात खळबळ

कोरोनाच्या संकटात आता निपाह व्हायरसमुळे चिंता वाढली आहे.

    नवी दिल्ली, 5 सप्टेंबर : देशभरात कोरोनाचा कहर (Coronavirus pandemic) सुरू असताना आता निपाह व्हायरसने (Nipah Virus) सर्वांची चिंता वाढवली आहे. धक्कादायक म्हणजे निपाह व्हायरसमुळे केरळात (Kerala) एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने आपली एक टीम तात्काळ केरळला रवाना केली आहे. (12 year old died due to Nipah Virus) 3 सप्टेंबर रोजी केरळातील कोझिकोड जिल्ह्यात निपाह व्हायरसचा संशयिताची नोंद झाली होती. ज्यामध्ये 12 वर्षीय मुलामध्ये इंसेफेलाइटिस आणि मायोकार्डिटिसची लक्षणे आढळून आली होती. यानंतर या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान या मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा निपाह विषाणू बाधित असल्याच्या वृत्ताला पुणे एनआयव्हीने दुजोरा दिला आहे. या मुलाच्या मृत्यू नंतर केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC)कडून केरळला तांत्रिक मदतीसाठी एक टीम रवाना केली आहे. आरोग्य विभागाच्या एका सूत्राने शनिवारी पीटीआयला सांगितले की, निपाह संक्रमण झाल्याची माहिती मिळाल्यावर शनिवारी रात्री आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची राज्य सरकारने रात्री उशिरा एक बैठक घेतली. केंद्राने दिल्या महत्त्वाच्या सूचना केंद्र सरकारने तात्काळ मोठी पावले उचलत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये कुटुंब, गावात संशयास्पद रुग्णांचा शोध घेतला जात आहे. तसेच गेल्या 12 दिवसांत या मुलाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे. या सर्वांची तपासणी करुन नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. पंडित नेहरूंशी वैर का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल 'निपाह' विषाणू म्हणजे काय? जनावरं आणि माणसावर वेगाने हल्ला करतो आणि गंभीर आजार निर्माण करण्याची क्षमता पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, 1998 मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात विषाणू सापडला सुरुवातीला लागण डुकरांना लागण झाली होती, नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पसरला बांग्लादेश आणि मलेशियात प्रमाण जास्त 'निपाह'ची लक्षणं कोणती ? संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्क आल्यामुळे थेट मेंदूवर हल्ला करतो मेंदुत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षण सुरुवातीला 7-10 दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता
    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या