लहान बाळासह रस्त्यात उभी असलेली कार केली लंपास; गुन्हा केल्यानंतरही पोलिसांकडून चोराचं कौतुक

लहान बाळासह रस्त्यात उभी असलेली कार केली लंपास; गुन्हा केल्यानंतरही पोलिसांकडून चोराचं कौतुक

त्या हळव्या चोराने गुन्हा केला मात्र...

  • Share this:

वॉशिंग्टन, 19 जानेवारी : भारतात (India) मोठया प्रमाणात वाहनचोरीच्या घटना आपण पाहत असतो. अशा प्रकारच्या घटना केवळ भारतातच नव्हे तर जगभरात घडत असतात. वाहन निर्मिती कंपन्यांनी वाहनांच्या सुरक्षेसाठी विविध उपाय केले आहेत. परंतु वाहन चोरांनी त्यातूनही मार्ग काढत वाहन चोरी होण्याच्या घटना सुरु आहेत. अमेरिकेत अशाच पद्धतीची एका विचित्र घटना समोर आली असून चोराने एका महिलेची गाडी चोरली. परंतु गाडीमध्ये मागच्या सिटवर लहान मूल असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्याला पुन्हा आईकडे सोपवत गाडी घेऊन फरार झाल्याची विचित्र घटना घडली आहे.

ओरेगोनियनमध्ये (Oregonian) आलेल्या वृत्तानुसार, शनिवारी 16 जानेवारीला ओरेगॉनमधील बीव्हरटोन येथे ग्रोसरी दुकानाच्या बाहेर ही घटना घडली. या महिलेने दुकानाच्या बाहेर आपली गाडी पार्क केली आणि आत दूध आणि मटण खरेदी करण्यासाठी गेली. परंतु या महिलेने अतिशय गंभीर चूक करत गाडी चालू स्थितीत आणि लॉक न करताच उभी केली होती. याचबरोबर गाडीमध्ये मागच्या सीटवर तिचा लहान मुलगा देखील होता. बीव्हरटॉन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चोरणारा हा व्यक्ती त्या ठिकाणाहून चालला असता त्याला गाडी चालू अवस्थेत दिसली. यामुळे त्याने ही गाडी चोरण्याचा निर्णय घेतला. परंतु काही अंतर पुढे गेल्यानंतर मागच्या सीटवर चार वर्षाचे लहान मूल असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा गाडी वळवत लहान मुलाला या महिलेकडे सोपवले. यामध्ये चकित करणारी गोष्ट म्हणजे या महिलेकडे या मुलाला सोपवल्यानंतर हा चोर गाडी घेऊन पुन्हा फरार झाला.

बीव्हरटोन पोलीस, प्रवक्त्या अधिकारी मॅट हेंडरसन (Matt Henderson) यांनी सीएनएनला (CNN) दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरणारा हा चोर 20 ते 30 वर्षांचा आहे. त्याने गाडी चोरी केल्यानंतर मागच्या सीटवर लहान मूल असल्याचे लक्षात आल्यानंतर गाडी वळवून पुन्हा महिलेकडे येत तिला गाडीमधून मूल घेण्याची ऑर्डर दिली. त्यानंतर पुन्हा गाडी घेऊन फरार झाला. याविषयी अधिक बोलताना त्यांनी चोराने निदान मूल आईकडे परत सोपवण्याची सभ्यता दाखवल्याबद्दल त्याचे आभार मानले.  या प्रकरणात महिलेची चुकी नसल्याची पोलिसांचे म्हणणे आहे, परंतु बरोबर लहान मुले असताना अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेत लहान मुलाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचली नसून पोलिसांनी काही तासांतच या महिलेच्या गाडीचा शोध लावला. पोर्टलँडमध्ये सिल्वर रंगाची ही होंडा पायलट गाडी पोलिसांनी जप्त केली असून ब्राऊन रंगाचे केस आणि गव्हाळ वर्णाच्या संशयिताच्या शोधात पोलीस आहेत. यामुळे अमेरिकेत घडलेल्या या घटनेनं भारतात देखील सावध राहण्याची गरज आहे. या पद्धतीची घटना कुणाबरोबरही घडण्याची शक्यता असून सावध राहण्याची गरज आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 19, 2021, 8:43 PM IST

ताज्या बातम्या