अरे माणुसकी मेली का तुमची? 'कोरोना'च्या अफवेने पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर बहिष्कार

अरे माणुसकी मेली का तुमची? 'कोरोना'च्या अफवेने पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबावर बहिष्कार

महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफेवेमुळे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबाला पाणीही देत नाहीत.

  • Share this:

दौंड 27 मार्च : सध्या कोरोनो व्हायरसने देशभरच नाहीतर संपूर्ण जगात थैमान घातले असताना, नागरिकांमध्ये याची दहशत निर्माण झालीय, अनेक अफवा देखील सोशल मीडियावर पसरत असतात असाच प्रकार दौंड तालुक्यातील भरतगाव या ठिकाणी घडलाय, कर्तव्य बजावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफवेने अक्षरशः तिच्या घरच्यांचे पाणी बंद करून घरावर बहिष्कार टाकण्यात आलाय,सदर महिला कॉन्स्टेबल ही दंगल नियंत्रण पथकात सेवेत असून या महिलेला कोरोना व्हायरसची लागण झालीय अशी अफवा गावामध्ये पसरली, आणि या अफवेने गावातील काही नागरिकांनी अक्षरशः या कुटुंबाचे पाणी बंद केले आहे.

दौंड तालुक्यातील भरतगाव येथील महिला कॉन्स्टेबलला कोरोना झालाय या अफेवेमुळे एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबालाच फटका बसलाय. या महिलेस खोकला व सर्दी असल्याने ही सुट्टी घेऊन आपल्या घरी भरतगाव या ठिकणी आली होती, मात्र खोकला असल्याने तिला कोरोना झालाय या अफवेने गावातील लोक पाणीही देत नाही.

अत्यावश्यक गोष्टी देण्यास टाळाटाळ करत असल्याचे या महीलेने सांगितलं. तर सदर महिलेला कोरोना झाला नसून तसे तिला सर्टिफिकेट देखील देण्यात आले असून अफवा पसरवणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शशिकांत इरवाडकर यांना सांगितले.

दादा यांना आवरा...अजित पवारांच्या काटोवाडीतही युवकांचा पोलिसांवर हल्ला

दीड वर्षाच्या मुलाला कोरोना - मुंबई आणि परिसरात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहे. नवी मुंबईत एका कुटुंबातल्या दीड वर्षांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या कुटुंबातल्या तिघांना या आधीच कोरोनाची लागण झाली आहे. नवी मुंबईतला हा 8वा कोरोनाबाधित रुग्ण आहे. आता या चौघांवरही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबईत आज विदेशातून आलेले 95 नागरीक आढळून आलेत. त्या सगळ्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

अरे देवा...नवी मुंबईत दीड वर्षाच्या बाळाला कोरोना, एकाच घरातला चौथा रुग्ण

नवी मुंबईतल्या एका मशिदीमध्ये फिलिपाईन्सचा नागरीक आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याच्यामुळे मशिदीतल्या मौलानांना लागण झाली. नंतर त्यांचा मुलगा, सून आणि आता नातवालाही लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

First published: March 27, 2020, 10:13 PM IST

ताज्या बातम्या