News18 Lokmat

भोंदू बाबाने केली माजी आमदारांची 1 कोटीची फसवणूक

विजय कांबळेंना 1 कोटी 70 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 01:22 PM IST

भोंदू बाबाने केली माजी आमदारांची 1 कोटीची फसवणूक

पनवेल,12 ऑक्टोबर: पनवेलमध्ये एका भोंदूबाबाने राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि कामगार नेते विजय कांबळेंना 1 कोटी 70 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

वशीला लावून सरकारी मंडळावर मोठं पद देण्याची थाप या बाबाने कांबळे यांना दिली होती. त्यानंतर त्यांच्या कडून 1 कोटी 70 लाख उकळून तो निघून गेला. या भोंदूबाबाला कामोठी पोलीसांनी जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली आहे. उदयसिंग प्रतापराव चव्हाण उर्फ महाराज असं त्याचं नाव आहे. अटकेनंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. भोंदू बाबाने राजकीय नेत्यांना फसवायची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अशा घटना अनेकदा घडल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2017 11:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...