धक्कादायक! वडील रागावले म्हणून 9 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 6 दिवसानंतर सापडला मृतदेह

सोशल मीडियामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो याचं जीवंत उदाहरण नवी मुंबईत समोर आलं आहे. वडील रागावल्यामुळे अवघ्या 9 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 02:31 PM IST

धक्कादायक! वडील रागावले म्हणून 9 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 6 दिवसानंतर सापडला मृतदेह

नवी मुंबई, 08 जानेवारी: सोशल मीडियामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होतो याचं जीवंत उदाहरण नवी मुंबईत समोर आलं आहे. वडील रागावल्यामुळे अवघ्या 9 वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे.

वडील रागावले म्हणून गेल्या 6 दिवसांआधी हा मुगला घर सोडून निघून गेला. गेली 6 दिवस तो बेपत्ता होता. आज नवी मुंबईच्या कोपरखैराने इथल्या नाल्याजवळ त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलमुळे मुलं खूप हट्टी झाली आहे. त्यात ब्ल्यू व्हेल गेमसारख्या गेममुळे लहान मुलं आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यात त्यांच्या रागाचं प्रमाणही वाढलं आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर राग धरत असं टोकाचं पाऊल लहान मुलांकडून उचललं जात आहे.

दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास घेत आहे. अपहरण करून हत्या केल्याचाही प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणाचा कसून तपास आता कोपरखैराणे पोलीस करत आहेत.

Loading...

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं ठाणे हादरलं, 12 व्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन

गेल्या काही दिवसांआधी ठाण्यातील शमिष्ठा सोम या 27 वर्षीय तरुणीने 12 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. एमबीबीएस असणाऱ्या शमिष्ठाला एमडी व्हायचं होतं. 'नीट'च्या परिक्षेचा अभ्यास झाला नाही, म्हणून आत्महत्या करत आहे, अशी सुसाईड नोट शमिष्ठाने लिहून ठेवली होती.

रात्री जेवण झाल्यावर शमिष्ठा सोमचे आई वडील झोपी गेले आणि नंतर शमिष्ठा 5 वाजेपर्यंत अभ्यास करत होती, असं शमिष्ठाच्या आई वडीलांच्या चौकशीतून समोर आलं. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळी शमिष्ठाचे आई वडील घरात झोपले होते. त्यावेळी तणावात असणाऱ्या शमिष्ठाने इमारतीवरून उडी घेत आपलं जीवन संपवलं.

शमिष्ठा एमबीबीएस डॉक्टर होती आणि पुढे तिला एमडी व्हाययचं होतं. त्याकरता ती गेले अनेक दिवस तयारी करत होती. पण आपला अभ्यास होत नसल्याने शमिष्ठा हिला सतत मानसिक ताण येत होता. या विषयावरून शमिष्ठाची शुक्रवारी आई वडीलांशी चर्चा देखील झाली असल्याचं सांगण्यात आलं होतं.

आई वडिलांनी शमिष्ठाला समजवले आणि अभ्यासाकरता बसवून झोपी गेले. पण आपले एमडी होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही, याची खंत मनात होती. या कारणाने शमिष्ठाने हे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात उघड झालं.


VIDEO : तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही -पंकजा मुंडे


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 02:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...