BREAKING: मुंबईत 7 मजली इमारतीचा भाग कोसळला, महिला अडकल्याची भीती

BREAKING: मुंबईत 7 मजली इमारतीचा भाग कोसळला, महिला अडकल्याची भीती

3 ते 7 व्या मजल्याच्या मागील संपूर्ण भाग कोसळला असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 02 सप्टेंबर : मुंबई गेल्या काही दिवसांत इमारती कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत असताना अशीच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या डोंगरी भागात 7 मजली इमारतीचा भाग कोसळला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 3 ते 7 व्या मजल्याच्या मागील संपूर्ण भाग कोसळला असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटना घडताच तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. यानुसार बचाव कार्य सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या भीषण अपघातामध्ये इमारतीच्या जिन्याजवळ एक महिला अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही इमारत नेमकी कशी कोसळली आणि यात आणखी कोणी अडकलं आहे का याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर बचाव कार्य सुरू असून नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रात्रीच्या सुमारास नालासोपाऱ्यातही इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर इथे रात्री दीडच्या सुमारास साफल्य इमारत कोसळली. या इमारतीत 5 कुटुंब राहत होते. कुटुंबीयांना चाहुल लागताच ते बाहेर निघाले आणि मोठा अनर्थ टळला. पण यावेळी घरातील सामानाची हानी झाली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची टीम दाखल झाली आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 2, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading