बारामती, 07 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा धोका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. रोज कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात आता राज्य अनलॉकच्या प्रक्रियेत आहे. त्यामुळे रुग्ण वाढीच्या संख्येत आणखी वाढ झाली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा धोका जास्त आहे. पण आता कोरोनाचे आणखी नवे हॉटस्पॉट वाढत चालले आहेत. बारामतीत कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने आजपासून 7 दिवस जनता कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
अरे देवा! पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच मंत्र्यासह तब्बल 21 जणांना झाला कोरोना
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आतापर्यंत 1400 हुन अधिक कोरोना बाधीत रूग्ण सापडले आहेत. यात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपासून बारामतीतील मेडिकल आणि दुध वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. कुणालाही बाहेर किंवा आत प्रवेश दिला जात नाही. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, सोनिया गांधी यांना पाठवलं आणखी एक पत्र
दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येने रविवारी सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात 24 तासांमध्ये तब्बल 23 हजार 350 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर 328 रूग्णांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्यू दर 2.92 एवढा झाला आहे. दिवसभरात 7826 रू्गणांना डिस्चार्ज मिळाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 71.03 एवढं आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या 9 लाख 7 हजार 212वर गेली आहे.
राज्यात 2 लाख 35 हजार 857 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, भारतातही कोरोना रुग्णांचा संख्या दररोज वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तर 80 हजारांच्यावर नवे रुग्ण निघत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms, Lockdown