ठाण्याच्या पुलावर व्यक्तीने घेतला गळफास, मृत्यूच्या दारातून असे आले परत!

ठाण्याच्या पुलावर व्यक्तीने घेतला गळफास, मृत्यूच्या दारातून असे आले परत!

ठाणे वाहतूक पोलीसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 03 डिसेंबर : ठाण्याच्या कळवा इथे एका 40 वर्षीय व्यक्तीने उड्डाण पुलावर स्वत:ला गळफास लावून घेतलल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, ठाणे वाहतूक पोलीसांनी आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान दाखवत जवळच असलेल्या हायड्राने त्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढले. भगवान कांबळे असं या व्यक्तीचं नाव असून नुकतंच त्यांच्या मुलाचं निधन झाले आहे. त्यामुळे मानसिक धक्का तसेच झालेला कर्जबाजारीपणाला कंटाळून भगवान यांनी हे कृत्य केलं असल्याची माहिती आहे.

आज सकाळी साडे दहाच्या सुमारास कळव्यातील कळवा नाका उड्डाण पुलावर भगवान कांबळे गेले आणि त्यांनी सोबत आणलेला दोरखंड उड्डाणपुलावरील रेलिंगला बांधून फास घेतला. मात्र, हा सर्व प्रकार खाली उभे असलेले नागरीक पाहत होते. नागरीकांना पोलिसांना सांगून हायड्रा लावून भगवान कांबळे यांना सुखरुप खाली उरवलं. त्यानंतर त्यांना नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मोठी बातमी - पुणे हादरलं, घरात सापडला उच्चशिक्षित तरुणीचा मृतदेह

दरम्यान, भगवान यांनी हे कृत्य करताना मद्यप्राशन केल्याची माहितीही पोलीस चौकशीत समोर आली आहे. दरम्यान, आज मुंबईत अपघाताचा आणि खुनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळच्या सुमारास डोंबिवलीतही भीषण अपघात होऊन यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भरधाव ट्रकने  तिघांना चिरडलं आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

व्हायरल बातमी - PUBG गेममुळे तरुणाच्या डोक्यावर परिणाम, व्यक्तीचं नाव ऐकून विश्वास बसणार नाही!

डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरातील ही घटना आहे. मृतांमध्ये एक महिला, पुरुष आणि एका चिमुरडीचाही समावेश आहे. तर एका लहान मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या मुलाला तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आज डोबिंवलीमध्ये आणखी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कल्याण-डोंबिवलीचे राष्ट्रवादी शिक्षक सेलचे जिल्हापदाधिकरी प्रभाकर ठोके यांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. डोंबिवलीत घरडा सर्कल जवळील ही घटना आहे.

इतर बातम्या - धक्कादायक! मुंबईच्या बीचवर सुटकेसमध्ये सापडले हात आणि पायाचे तुकडे, मृतदेह कोणाचा?

या दोन्ही प्रकरणात पोलीस तपास करत असून नेमक्या अपघाताच्या घटना कशा घडल्या याचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहेत. तर परिसरातील अपघात थांबवण्यासाठी वाहतूकीचे नियम कठोर करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

First published: December 3, 2019, 1:10 PM IST
Tags: thane

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading