धक्कादायक! ट्रॅक्टरने उडवल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रॅक्टर चालकालाच संपवलं

धक्कादायक! ट्रॅक्टरने उडवल्याने 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त जमावाने ट्रॅक्टर चालकालाच संपवलं

3 वर्षीय सोहम मोरे हा ऊस तोड मजूराचा मुलगा खेळताना रस्त्यावरून चाललेल्या ट्रॅक्टर समोर आला आणी ट्रॅक्टरखाली त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

अहमदनगर, 06 फेब्रुवारी  : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ट्रॅक्टरच्या धडकेत ऊसतोड कामगाराच्या 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यानंतर संतप्त झालेल्या कामगारांनी ट्रॅक्टर चालकाला बेदम मारहाण केली आणि त्यात चालकाचाही मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील ही धक्कादायक घटना आहे. 3 वर्षीय सोहम मोरे हा ऊस तोड मजूराचा मुलगा खेळताना रस्त्यावरून चाललेल्या ट्रॅक्टर समोर आला आणी ट्रॅक्टरखाली त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या आठ ते दहा ऊसतोड मजुरांनी ट्रॅक्टर चालक अक्षय थोरात याच्यावर लाठ्या काठ्या आण् ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला केला. या बेदम मारहाणीमुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला.

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बेलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऊसतोड कामगारांपैकी 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता आणि लाठ्या-काठ्या ताब्यात घेतल्या. दोघांचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनास पाठवण्यात आला. तर या प्रकरणात नेमकी कोणाची चूक होती याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.

LIVE मर्डर : तेरी-मेरी यारी संपली, मित्रावर 16 वार करून केली हत्या

First published: February 6, 2019, 8:38 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading