पिंपरीकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाचे 3 रुग्ण झाले ठणठणीत बरे तर....

पिंपरीकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाचे 3 रुग्ण झाले ठणठणीत बरे तर....

11 मार्च रोजी दुबईहून आलेल्या 3 प्रवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णलायत उपचार सुरू होते.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 26 मार्च : सगळं जग कोरोनामुळे हैराण झालं आहे. असं असताना भारतातही कोरोनाचा फैलाव वाढत आहे. पण एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे झाल्याचंही समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पण पुण्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही आढळेल्या 3 कोरोना बाधितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती पिंपरी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली आहे. या बातमीमुळे पिंपरीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

11 मार्च रोजी दुबईहून आलेल्या 3 प्रवाश्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णलायत उपचार सुरू होते. काल त्यांच्या उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी करण्यासाठी त्यांच्या घशातील द्रव्य पाठविण्यात आले. तेव्हा काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात तिघाचीही चाचणी निगेटिव्ह आली असून आज पुन्हा एकदा चाचणी केली जाईल आणि पुढील अहवालही निगेटीव्ही आल्यास त्यांना लवकरच घरी सोडलं जाईल अस पाटील म्हणाले.

हे वाचा - मुंबईत प्रभादेवी भागात महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह

आणखी दिलासादायक बाब म्हणजे मागील 5 दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये एकही नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली नाही. तर ज्या 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र पिंपरी शहरात सुमारे 1200 पेक्षा अधिक रुग्णांना कॉरटाईन करण्यात आलं असून नागरिकांनाही विनाकारण घराबाहेर न पडण्याच अहवान पालिका प्रशासनाकडून केलं गेलं.

पुणेकरांसाठी Good News

पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, असंही माहिती मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. कोरोनाला मुळापासून नष्ट करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. प्रत्येकाने या नियमांचं पालन केलं तर त्याचा मोठा फायदा जनतेला होऊ शकतो.

हे वाचा - सावधान! फक्त 20 मिनिटांत पसरतोय कोरोना, घरातच थांबा नाहीतर...

महाराष्ट्रातील पहिलं कोरोनाग्रस्त दाम्पत्य यांच्यासह दाम्पत्याची मुलगी, दाम्पत्याला मुंबईहून घेऊन येणारा कॅब चालक आणि दुबई ट्रिपमधीलसह एक प्रवासी यांचा यात समावेश आहे. यातील दाम्पत्याचे दुसरे निगेटिव्ह रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा तर उरलेल्या तिघांचे निगेटिव्ह रिपोर्ट बुधवारी संध्याकाळी आले आहेत. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ते आता ठणठणीत बरे झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

First Published: Mar 26, 2020 09:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading