मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

फायनान्स क्षेत्रातील गोव्याच्या तरुणाची मुंबईत आत्महत्या, नस कापून संपवलं आयुष्य

फायनान्स क्षेत्रातील गोव्याच्या तरुणाची मुंबईत आत्महत्या, नस कापून संपवलं आयुष्य

  • Published by:  Renuka Dhaybar

मुंबई, 11 डिसेंबर : भांडूपमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही हाताच्या नसा कापून घेत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

अभिषेक अय्यर असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. कोणत्यातरी गंभीर आजारामुळे तो मानसिक तणावाखाली होता आणि म्हणून त्याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक हा पवईत एका फायनान्स कंपनीत काम करत होता. कामावरून घरी आल्यानंतर त्याने नैराश्यात दोन्ही हाताच्या नसा कापून घेत आयुष्य संपवलं.

इतर बातम्या - डीएसकेंच्या अडचणीत वाढ, सांगली पोलिसांनी पत्नी आणि मुलासह येरवडा जेलमधून अटक

अभिषेक हा मुळचा गोव्याचा आहे पण कामासाठी तो भिवंडीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. सोमवारी रात्री इमारतीच्या 15 व्या मजल्यावर त्याने आत्महत्या केली. त्याच्यासोबत राहणाऱ्या इतर मित्रांना अभिषेकचा मृतदेह आढळून आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. रक्ताच्या थोराळ्यात मृतदेह पडला असल्याची माहिती अभिषेकच्या मित्रांकडून देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून अभिषेकचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी नजिकच्या राजवाडा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती अभिषेकच्या कुटुंबियांना दिल्यानंतर ते गोव्याहून मुंबईत आले आणि मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

इतर बातम्या- भारतीय पोषाख परिधान करून 'Nobel' घेण्यासाठी पोहोचले अभिजीत बनर्जी, एस्टर डफलो

दरम्यान, घरातील तरुण मुलाने अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे अय्यर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून अधिक माहितीसाठी अभिषेकच्या मित्रांची आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

First published: