मुंबईत 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 'निर्भया'चा मृत्यू; अखेर मृत्यूशी झुंज संपली!

मुंबईत 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 'निर्भया'चा मृत्यू; अखेर मृत्यूशी झुंज संपली!

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान नऊ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे. तर मुंबईसारख्या शहरामध्ये झालेल्या या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मुंबई, 29 ऑगस्ट : मुंबईतील चेंबूर परिसरात चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केलेल्या 19 वर्षीय पीडित तरुणीची मृत्यूसोबतची झुंज अखेर संपली. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारादरम्यान नऊ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे. तर मुंबईसारख्या शहरामध्ये झालेल्या या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रहिवासी 19 वर्षीय पीडिता मुंबईतील चेंबूर परिसरात राहणाऱ्या भावाकडे राहण्यासाठी आली होती. 7 जुलै रोजी ती मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते असं घराबाहेर पडली. पण त्यावेळी 4 नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या दिवसापासून पीडित तरुणी मरणयातना भोगत होती. बलात्कारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. तिच्यावर औरंगाबादमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण सकाळच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला.

ज्यावेळी बलात्काराची घटना घडली तेव्हा पीडित तरुणीने घाबरून कोणालाही यासंदर्भात माहिती दिली नाही. पण तिच्या वागण्यातला बदल आणि तिची प्रकृती नाजूक होत चालल्याचं लक्षात घेत तिला 23 जुलैला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर याबद्दल पीडितेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली.

इतर बातम्या - बाळासाहेब ठाकरेंनी आमदाराचा ‘माकड’ असा केला होता उल्लेख, VIDEO व्हायरल

पीडितेच्या कुटुंबियांनी तिला विश्वासात घेत तिची विचारपूस केली असता तिने 4 जणांनी बलात्कार केल्याची माहिती दिली. सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी चेंबूरमधील पोलीस स्थानकांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला या सगळ्याचा मोठा धक्का बसला होता. ती कोणत्याही वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देत नव्हती.

डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. अखेर तिची मृत्यूशी झुंज संपली आणि तिचा मृत्यू झाला. घरातल्या तरुण मुलीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे तिच्या घरच्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तर तिच्या जाण्यावर संपूर्ण गावातून शोक व्यक्त केला जात आहे.

VIDEO: 'राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही', दानवेंकडून शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 11:42 AM IST

ताज्या बातम्या