नागपूर, 27 नोव्हेंबर : बलात्काराच्या घटनेनं पुन्हा एकदा नागपूर शहर हादरलंय. पारडी परिसरात १९ वर्षीय तरुणीवर ५२ वर्षीय नराधमांनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आहे. कामठी गॅंगरेपची घटना ताजी असतानाच, बलात्काराची ही धक्कादायक घटना पुढे आली आहे. त्यामुळे नागपुरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिचा भाऊ पारडीतील एका कंपनीत काम करतात. याच कंपनीमध्ये आरोपी योगीलाल रहांगडाले हा सुपरवाझर म्हणून काम करतोय. कंपनी लगत असलेल्या एका खोलीत पीडित आणि तिचा भाऊ राहत होता. 21 जानेवारी पीडितेचा भाऊ गावी गेला होता. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने मध्यरात्री आरोपी रहांगडले खोलीत आला. पीडित तरुणीने त्याचा विरोध केला होता, पण त्याने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. हा नराधमाचे कृत्य एवढ्यावरच थांबले नाही. त्याने पीडितेच्या गुप्तांगात रॉड टाकल्याची पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
सकाळी शुद्धीवर आल्यानंतर पीडित तरुणीने आरडाओरडा करून मदतीसाठी कर्मचाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पीडितेच्या तक्रारीनंतर पारडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पारडी परिसरात २१ तारखेला बलात्काराची ही घटना घडली. पण पीडितेनं तीन दिवसांनी त्याची तक्रार दाखल केली, अशी माहिती पारडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
निर्भयाचा दोषी पवनला फाशी होणारच, न्यायालयाने याचिका फेटाळली
दरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनच्या वडिलांनी दाखल केलेली याचिका पाटियाला हाउस कोर्टच्या सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे. 6 जानेवारीला मेट्रोपोलिटियन मॅजिस्ट्रेटने पवनच्या वडिलांची याचिका फेटाळली होती. यात त्यांनी म्हटलं होतं की, या प्रकरणामध्ये एकमेव साक्षीदाराने माध्यमांकडून पैसे घेऊन साक्ष दिली होती. यामुळे त्याची साक्ष सत्य आहे म्हणता येणार नाही.
पवनशिवाय या प्रकरणातील दोषी मुकेश कुमार सिंगनेसुद्धा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरोधात त्याने दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटलं की, जेव्हा एखाद्याला फाशी देण्यात येणार असेल तर त्याला प्राधान्य देण्यापेक्षा दुसरं काही गरजेचं असू शकत नाही.
2012 मध्ये निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर देश हादरला होता. नराधमांनी बलात्कार केल्यानंतर तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी निर्भयाचा मृत्यू झाला. यातील दोषी मुकेश कुमारची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला फेटाळून लावली होती.