रोज रिक्षाचालक काढायचा छेड, वैतागून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

रोज रिक्षाचालक काढायचा छेड, वैतागून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आत्महत्येचा प्रकार आईने पाहिल्यानंतर मुलीला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. पण...!

  • Share this:

बीड, 10 एप्रिल : बीड तालुक्यामध्ये अंथरवन पिंपरी इथे गावातल्याच रिक्षाचालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी प्राशन करत आत्महत्या केली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारा दरम्यान जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला.

छाया संपत राठोड (17, रा. अंथरवन पिंपरी, ता.बीड) असं मयत मुलीचं नाव आहे. तर प्रताप भानुदास पवार (२५) असं आरोपीचं नाव आहे.

गावातील रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या मुलीचा उपचारा दरम्यान काल रात्री  पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला.

छाया गावातील्याच महाविद्यालयात 11 वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील उसतोड कामगार आहेत. 15 दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते. मागील काही महिन्यांपासून प्रताप हा छायाचा पाठलाग करून छेड काढत होता. या त्रासाला छाया वैतागली होती. यातूनच तिने ३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केलं.

हा प्रकार आईने पाहिल्यानंतर तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केलं. तिथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. मात्र, तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला.

या प्रकरणात छायाचे वडील संपत पवार यांच्या जबाबावरून प्रताप विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करत आहेत. तर पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी परिसरात चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, घरातल्या तरुण मुलीला अशा पद्धतीने गमावल्याने संपूर्ण राठोड कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे तर परिसरातून यावर शोककळा पसरली आहे.

VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण

First Published: Apr 10, 2019 07:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading