Home /News /news /

बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाच्या संकटात नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

बेरोजगारांसाठी दिलासादायक बातमी, कोरोनाच्या संकटात नवाब मलिकांनी दिली महत्त्वाची माहिती

कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण यामध्ये बेरोजगारांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मुंबई, 26 जुलै : कोरोनामुळे राज्यावर भीषण संकट ओढावलं आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था पणाला लागली असून लॉकडाऊनमुळे सगळ्यांवर घरी बसण्याची वेळ आली. यामुळे देशावर मोठं आर्थिक संकट कोसळलं आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. पण यामध्ये बेरोजगारांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. तर 1 लाख 72 हजार बेरोजगारांची रोजगारासाठी नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या बातमीमुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कौशल्य विकास विभागाची कामगिरी आणि महास्वयंम वेबपोर्टलच्या साहाय्याने ही रोजगार निर्मिती करण्यात येणार असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. राज्यातील मराठी तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशानं हे पोर्टल तयार करण्यात आलं. तर सुभाष देसाई यांनी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली होती. कोरोनात नोकरी गेल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल, लेकीला संपवून दांपत्याची आत्महत्या खरंतर, डोमिसाइल बंधनकारक असल्यामुळे फक्त भूमिपुत्रांनाच संधी मिळणार आहे. याचा फायदा घेत कंपन्यांनी आणि उद्योजकांनी स्थानिकांना नोकरी द्यावी. त्यांच्याकडील कौशल्याचा योग्य उपयोग व्हावा, त्यातून आपल्या विभागाचाही विकास व्हावा असं सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोर्टलच्या माध्यमातून 100 टक्के स्थानिकांना नोकरी मिळणार आहे. मुंबईचे होणार का वांदे? विमानाचं तिकीट देऊनही मजुरांचा परतायला नकार दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. राज्यात सध्या 65 हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे 17 हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसंच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे. याकामी उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या सूचना महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या