पिंपरी चिंचवड: सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केली हत्या

पिंपरी चिंचवड: सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून केली हत्या

पोलिसांनी फिर्यादीवरून आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहे.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड, 13 डिसेंबर : हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची पुनरावृत्ती करणारा एक धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका सावत्र वडिलांनीच 15 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. यानुसार पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार आणि मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी वडिल फरार झाला. पोलिसांनी फिर्यादीवरून आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन पथकं तयार करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या - माणसं जातीने नाही कतृत्वाने मोठी होतात, भाजप नेत्याचा पंकजा मुंडेंना खोचक टोला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वडील हा रिक्षाचालक आहे. त्याने त्याच्या सावत्र मुलीवर बलात्कार करून नंतर हत्या करत पळ काढला. दापोडी इथे पीडित मयत अल्पवयीन मुलगी, बहिण, आई आणि सावत्र वडिल असं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून राहत होतं. या प्रकरणात अधिक तपास केला असता घरातील दोन्ही अल्पवयीन मुलींची प्रेम प्रकरण असल्याचा सावत्र वडिलाला संशय होता. यावरून घरात सतत वाद व्हायचा.

इतर बातम्या - पंकजा मुंडेंना मुठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही तर..., भाजप नेत्याचा घणाघात

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास मयत मुलगी आणि सावत्र वडिल घरी एकटेच होते. तेव्हा याच मुद्द्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यातून नराधम वडिलांनी मुलीवर बळजबरीने बलात्कार केला आणि तिचा गळा आवळून हत्या केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

BREAKING: महाराष्ट्रात राजकीय तांडव, राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या नेत्यांची घरवापसी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2019 03:43 PM IST

ताज्या बातम्या