• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • आई रागवल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 4 दिवसानंतर सापडला मृतदेह

आई रागवल्यामुळे 14 वर्षाच्या मुलाची आत्महत्या, 4 दिवसानंतर सापडला मृतदेह

मनिषलाल बहादुर पटले हा शाळा सुटल्यानंतर थेट घरी न जाता मित्रांसोबत भटकत असल्याच्या कारणावरून त्याच्या आईने आतापर्यंत कुठे होता? अशी विचारणा करून त्याला रागावलं.

 • Share this:
  नागपूर, 29 ऑगस्ट : आई रागवल्याच्या रागातून एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने नदीत उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील मौदा इथल्या शिर्डी साई विद्यालयाच्या नववीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय विद्यार्थ्यांने आई रागावल्याच्या रागातून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मनिषलाल बहादुर पटले असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. आईच्या रागवण्याला मनावर घेत मनिषलालने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मनिषलाल बहादुर पटले हा शाळा सुटल्यानंतर थेट घरी न जाता मित्रांसोबत भटकत असल्याच्या कारणावरून त्याच्या आईने आतापर्यंत कुठे होता? अशी विचारणा करून त्याला रागावलं. आईने रागावल्याच्या कारणावरून संतापलेला मनिषलाल हा  सायकलने मौदा इथल्या जुन्या पुलावर पोहचला. त्यावेळी त्या परिसरात चांगलीच वर्दळ होती. मानिषलाल याने सायकल पुलावरच सोडून थेट नदीत उडी घेतली. पाण्याची पातळी खोल असल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला. उडी घेतल्यानंतर तो बराच वेळ बाहेर न आल्याने त्याचा शोध सुरू घेण्यात आला. मात्र, त्याचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर सदर घटनेची माहिती मौदा पोलीसांना देण्यात आली. पोलिसांनीसुद्धा त्याचा शोध घेतला. पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. 4 दिवस उलटून गेल्यानंतरी त्याचा मृतदेह आढळून आला नाही. त्यानंतर विषेश शोध पथकाला पाचारण करण्यात आलं. इतर बातम्या - एकत्र वेळ घालवण्यासाठी डेटिंगवर गेलं कपल, अज्ञातांनी प्रेयसीचं केलं अपहरण! कन्हान नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे शोध घेण्यास अडचणी येत होत्या. शेवटी मौदा तालुक्यातील नवेगाव शिवारात नदीच्या काठावरील गाळात मानिषलालचा मृतदेह रुतलेल्या परिस्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत. इतर बातम्या - दारूच्या नशेत बहिणीसमोर उलगडला आईच्या हत्येचा कट, सुपारी देऊन जन्मदातीला संपवलं! VIDEO: लालबागमध्ये राम मंदिराचा देखावा, पाहा EXCULSIVE दृश्यं
  Published by:Renuka Dhaybar
  First published: