पैसे चोरल्याचा आरोप सहन न झाला नाही, 12 वर्षाच्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल

पैसे चोरल्याचा आरोप सहन न झाला नाही, 12 वर्षाच्या मुलाने उचललं धक्कादायक पाऊल

50 रुपये चोरल्याचा आरोप सहन न झाल्याने 12 वर्षीय मुलाने रेल्वेसमोर उडी घेतली.

  • Share this:

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 19 ऑक्टोबर : सध्या सोशल मीडिया आणि मोबाईलचा जमाना आहे. त्यामुळे हल्लीची मुलं टोकाचं पाऊल घेण्यात पुढे असतात. त्यातून गुन्ह्याच्या आणि आत्महत्येच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. औरंगाबादमध्येही आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 50 रुपये चोरल्याचा आरोप सहन न झाल्याने 12 वर्षीय मुलाने रेल्वेसमोर उडी घेतली. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

50 रुपये चोरल्याचा आरोपा सहन न झाल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शहरातील शिवाजीनगर रेल्वे पटरीवर घडला आहे. सुरज जनार्धन क्षीरसागर असं आत्महत्या करणाऱ्या 12 वर्षीय मुलाचं नाव आहे. सुरजने ऐवढ्या लहान वयात इतकं टोकाचं पाऊल उचललं असल्यामुळे परिसरात पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तर त्याच्या अशा जाण्यावर शोककळा व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बातम्या - सलमान खानचा 'शेरा' शिवसेनेत, विधानसभेत महत्त्वाची भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने शाळेत जाऊन सुरजने दुकानातील गल्ल्यातील 50 रुपये चोरले असा आरडाओरड केला होता. शाळेत बदनामी झाली म्हणून तो शाळेतून निघून गेला. त्यानंतर रात्री त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला. या प्रकरणी मृत सुरजच्या वडिलांच्या तक्रारीवरून पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात सरला धुमाळ या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या - BREAKING : अज्ञात वस्तूच्या स्फोटामुळे कोल्हापुरात खळबळ, एकाचा मृत्यू

पोलिसांनी सरला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून आता संपूर्ण प्रकाराचा तपास सुरू आहे. सुरजने खरंच पैसे चोरले होते का? याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, घरतल्या हसत्या-खेळत्या लेकराला अशा पद्धतीने गमावल्यामुळे संपूर्ण क्षीरसागर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या - आज प्रचाराचा शेवटचा दिवस गाजणार, मुख्यमंत्री ते राज ठाकरे अशा आहेत सभा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 10:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading