कर्नाटक, 4 एप्रिल : कर्नाटकातील (Karnataka) मँगलोर (mangalore) च्या उल्लाल शहरात रविवारी सकाळी एका 12 वर्षीय मुलाचे प्रेत सापडले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या मुलाच्या कुटुंबियांनी शनिवारी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. शनिवारी रात्री तो घरी परतला नव्हता. मुलाचं प्रेत हे केळीच्या पानात तसेच नारळाच्या पानांखाली झाकलं गेलं होत. पोलिसांना रविवारी सकाळी 7 वाजता हे प्रेत सापडलं त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आलं आहे.
इयत्ता सहावीत शिकत असणारा मृत 12 वर्षीय मुलगा हा 17 वर्षीय मुलासोबत ऑनलाईन गेम खेळायचा. विचारपूस केल्यानंतर आरोपीने रात्री 9 वाजता आपण भेटलो होतो असे त्याने सांगितले. आरोपीने पुढे सांगितलं की, भेटल्यानंतर दोघांनी समोरासमोर पब्जी गेम (PUBG game) खेळायला सुरूवात केली. असं केल कारण जेव्हा आम्ही ऑनलाइन गेम खेळत होतो, तेव्हा नेहमी मी जिंकायचो. पण मृत 12 वर्षीय किशोर माझ्यावर फसवणुकीचा आरोप करायचा त्यामुळे आम्ही समोरासमोर खेळण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांआधी आम्ही भेटलो होतो. एका दुकानापाशी आमची भेट झाली. जिंकण्यासाठी तू आणखी कोणाची तरी मदत घेत असल्याचं तो मला म्हणायचा तेव्हा समोर येऊन खेळ मग कोण जिंकत ते पाहू, असं तो म्हणाल्याचं आरोपीने सांगितले.
हे ही वाचा-गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश
शनिवारी दोघेही भेटल्यानंतर 17 वर्षीय आरोपी गेममध्ये हरला. आणि त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झालं. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार आधी किशोरने त्याला धक्का दिला आणि छोटा दगड त्याला मारला. “त्यानंतर पलटवार करत मी त्याला मोठा दगड मारला त्यात तो जखमी झाला. खूप रक्तप्रवाह होत होता. तेव्हा मला काही समजत नव्हतं, मी त्याला रस्त्याच्या कडेला सोडून निघून गेलो.”
मृत मुलाच्या कुटुंबियांनी सांगितले कि तो आपल्या मुलाला गेम खेळण्यासाठी फोन करत असे. तर त्याच्या मित्रांनीही तो त्याच्याहून मोठ्या मुलांशी गेम खेळायचा असे म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा मुलांना गेम खेळण्याचं व्यसन लागतं तेव्हा त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी आहे की त्यांनी मुलांवर लक्ष ठेवावं. याप्रकारच्या गोष्टी कोणासोबतही होऊ शकतात. याआधी ब्लू वेल गेमच्या केसेस समोर आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.