11 महिन्याच्या चिमुकलीवर उपचार करण्यासाठी आईची भन्नाट आयडिया, आधी बाहुलीला बांधलं प्लास्टर!

लहान मुलांना त्यांच्या बाहुल्यांचा फार लळा असतो. बाहुल्यांसोबत खेळण्यात त्यांचा दिवस जातो. या 11 महिन्याच्या चिमुकलीलाही तिच्या बाहुलीचा फार लळा लागला होता. अखेर तिच्यावर उपचार करण्यासाठी या बाहुलीमुळे ऐवढी मदत झाली की डॉक्टरही शॉक झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : हल्ली लहान मुलं खूप हुशार असतात त्याचं एक उत्तम आणि गमतीशीर उदाहरण समोर आलं आहे. एका 11 महिन्याच्या लहान मुलीच्या पायाला प्लास्टर करायचं होतं. पण ती खूप रडत होती आणि डॉक्टरांना पायाला हातही लावू देत नव्हती. यावर तिच्या आईने भन्नाट युक्ती काढली. या घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

लहान मुलांना त्यांच्या बाहुल्यांचा फार लळा असतो. बाहुल्यांसोबत खेळण्यात त्यांचा दिवस जातो. या 11 महिन्याच्या चिमुकलीलाही तिच्या बाहुलीचा फार लळा लागला होता. अखेर तिच्यावर उपचार करण्यासाठी या बाहुलीमुळे ऐवढी मदत झाली की डॉक्टरही शॉक झाले.

लहान मुलांना त्यांच्या बाहुल्यांचा फार लळा असतो. बाहुल्यांसोबत खेळण्यात त्यांचा दिवस जातो. या 11 महिन्याच्या चिमुकलीलाही तिच्या बाहुलीचा फार लळा लागला होता. अखेर तिच्यावर उपचार करण्यासाठी या बाहुलीमुळे ऐवढी मदत झाली की डॉक्टरही शॉक झाले.

मुलीला प्लास्टर लावायचं होतं पण ती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती. त्यानंतर तिच्या आईने शक्कल लढवली आणि आधी मुलीच्य़ा बाहुलीवर खोटे खोटे उपचार करा मग ती पण तसं करून देईल अशी कल्पना आईने डॉक्टरांना दिली.

यानंतर डॉक्टरांनी आधी बाहुलीवर खोटे-खोटे उपचार केले. तिलाही प्लास्टर केले आणि मग काय मुलीनेही उपचाराला प्रतिसाद दिला.

जेव्हा मला मुलीला दूध पाजायचं असतं आणि ती रडायला लागते तेव्हा मी आधी तिच्या आवडत्या बाहुलीला दुध पाजण्याचं नाटक करते आणि मग चिमुकलीसुद्धा दुध पिते असं जखमी चिमुकलीच्या आईने डॉक्टरांना सांगितलं.

ही 11 महिन्याची चिमुकली बेडवरून खाली पडल्यामुळे तिचे पाय फॅक्चर झाले होते. तिला उपचारासाठी दिल्लीच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 30, 2019, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading