लिफ्ट आणि दरवाज्यात अडकला 9 वर्षाच्या चिमुकलीचा पाय, पुढे काय झालं तुम्ही वाचा

सावधान! तुमच्या मुलांना लिफ्टपासून दूर ठेवा.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2019 11:36 AM IST

लिफ्ट आणि दरवाज्यात अडकला 9 वर्षाच्या चिमुकलीचा पाय, पुढे काय झालं तुम्ही वाचा

हैदराबाद, 20 ऑक्टोबर: एका रहिवासी इमारतीच्या लिफ्ट आणि एलिवेटरमध्ये अडकून 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हस्तिनापुरम नॉर्थ एक्सटेंशन कॉलनीमध्ये आपल्या घरी दुपारी 12.30 वाजता

लेसिया यादव तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमधून जात होती. यावेळी तिचा पाय लिफ्टच्या दरवाजात अडकला. तिचा पाय सोडवायला जाणार एवढ्या कोणीतरी वरुन लिफ्टचं बटण दाबल्यामुळे लिफ्ट तशीच वर जायला लागली.

पोलिसांच्या माहितीनुसार लसियाच्या शरीराचा भाग हा लिफ्ट आणि एलिवेटरच्यामध्ये अडकला होता त्यामुळे लसिया गंभीर जखमी झाली. लिफ्टचं बटण दाबल्यामुळे लिफ्ट वर जायला लागली आणि तिचा पाय चिरत गेला. त्यानंतर लसियाला रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान या दुर्घटनेची माहिती लसियाच्या वडिलांना कळताच त्यांनी तात्काळ अँब्युलन्स बोलवून रुग्णालयात दाखल केलं. मात्र दोन तासांतच लसियाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

राज्य बाल अधिकारी संघाचे अध्यक्ष पी. अच्युता राव यांची दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. दरम्यान सुरक्षा मनकांना धाब्यावर बसवून लिफ्ट लावणाऱ्या इमारतींवर कारवाई करण्यात यावी असं त्यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेला इमारतीची लिफ्टच जबाबदार असल्याचा दावाही त्यांनी केला.

Loading...

लिफ्टमध्ये अडकल्याचा अनेक घटना समोर येत आहेत. त्यामुळे अशावेळी पालकांनी थोड जागृक राहाणं आवश्यक आहे. लिफ्टमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसतील तर तत्काळ नगररपालिका अथवा सोसायटीच्या अध्यक्षांना सांगून त्या करुन घेणं हे पाल्यांचा सुरक्षित ठरु शकतं.

VIDEO : परळीपासून ते वरळी 'या' आहे राज्यातील बिग फाईट्स, कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 20, 2019 11:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...