राजस्थानात भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

राजस्थानात भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला

  • Share this:

भीलवाडा, 11 फेब्रुवारी : राजस्थानातील भीलवाडा (Bhilwara) येथे काल सोमवारी रात्री उशिरा बस आणि क्रुझरमध्ये झालेल्या टक्करमध्ये 9 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर लागलीच जखमींना मदत मिळाली. सध्या या अपघातात बचावलेल्या जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे.

भिलवाडा शहरातील लग्नाच्या कार्यक्रमाला हजेरी लावून कुटुंब आपल्या गावी परतत होते. हे कुटुंब  भिलवाडा येथून कोटा जिल्ह्यातील रामगड मंडी येथे क्रूझरने रवाना झाले होते. ही क्रुझर बिगोद कस्ब्याजवळ गेली असताना बसचालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. बसचालकाने मात्र ओव्हर टेक करीत असताना समोरच्या क्रुझरला टक्कर दिली. यानंतर अनियंत्रित झाल्याने त्याची बस रस्त्याखाली उतरली. ही बस अत्यंत वेगात होती. या अपघातात 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. तर 15 जखमींना भिलवाडा येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

गाडीवर नियंत्रण न राहिल्याने हा अपघात झाल्याचे क्रुझरमध्ये बसलेल्या नागरिकांचे म्हणणे आहे. गती जास्त असल्याने बसचालकाचे नियंत्रित राहिले नाही आणि तिने समोरच्या गाडीला टक्कर दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून ज्यामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एक मुलगी होती.

CM गहलोतने व्यक्त केले दु:ख

या भीषण दुर्घटनेवर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दु:ख व्यक्त केले. त्यानी ट्विट करुन म्हटले आहे, मला या भीषण दुर्घटनेची माहिती मिळाली आहे. या घटनेत अनेकांचा हकनाक मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांसोबत संवेदना व्यक्त करतो आणि प्रार्थना करतो की दु:खाच्या या प्रसंगी देव त्यांना सहनशक्ती देऊ दे. याशिवाय जखमींवर चांगल्या प्रकारे उपचार व्हावेत याचे निर्देश देण्यात आले आहे.

First published: February 11, 2020, 8:28 AM IST

ताज्या बातम्या