केंद्राकडून प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची दिवाळी भेट

केंद्राकडून प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाची दिवाळी भेट

विद्यापीठ स्तरावरील प्राध्यपकांनाही अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. देशभरातील 7.51लाख प्राध्यापकांना हा सातवा वेतन लागू होणार असून त्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीवर तब्बल 22 हजार कोटींचा बोजा पडणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : विद्यापीठ स्तरावरील प्राध्यपकांनाही अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. देशभरातील 7.51लाख प्राध्यापकांना हा सातवा वेतन लागू होणार असून त्यासाठी केंद्र सरकारच्या तिजोरीवर तब्बल 22 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीत यासंबंधीची माहिती दिली.

विशेष म्हणजे 1 जानेवारी 2016पासून सातव्या वेतन आयोगाची अंमलजबावणी झाली असल्याने या प्राध्यापक मंडळींना तब्बल 22 महिन्यांचा फरकही मिळणार आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्राध्यापक लोकांची चांदी होणार आहे. 329 विद्यापीठांमधल्या 12, 912 कॉलेजेसमधल्या असिस्टंट आणि असोसिएट प्रोफेसर मंडळींना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2016पासून सातवा वेतन आयोग लागू झालाय पण प्राध्यापक मंडळी आजवर त्यापासून वंचित होती. आता त्यांनाही सातवा वेतन आयोग लागू झाल्याने देशभरातल्या प्राध्यापक मंडळींची दिवाळी एकदम खुशीत जाणार आहे.

First published: October 11, 2017, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading