• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • मैत्रिणी म्हणाली दरोडा टाकूया, पठ्ठ्यांनी डॉक्टराला कोयत्याचा धाक दाखवून लुटले 7 लाख, पण...

मैत्रिणी म्हणाली दरोडा टाकूया, पठ्ठ्यांनी डॉक्टराला कोयत्याचा धाक दाखवून लुटले 7 लाख, पण...

अखेर ‘लंबी जुदाई’ संपली, पाकिस्तानात अडकलेल्या नववधूचा 3 वर्षांनी गृहप्रवेश

अखेर ‘लंबी जुदाई’ संपली, पाकिस्तानात अडकलेल्या नववधूचा 3 वर्षांनी गृहप्रवेश

पाच जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली.

  • Share this:
सांगली, 12 सप्टेंबर : मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्र काय करील याचा नेम नाही. सांगलीमध्ये मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी दरोडा (Robbery) टाकल्याची घटना समोर आली आहे. प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी (dr nalini nadkarni) यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावून दरोडा टाकला होता. अखेर पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले आहे.  या पाच जणांकडून एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीतील विश्रामबाग परिसरात राहणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टर नलिनी नाडकर्णी यांच्या घरात घुसून चाकू गळ्याला लावू दरोडा टाकल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. अटकेतील पाच जणांकडून 5 लाख 97 हजारांचे दागिने, 37 हजारांचा मोबाईल, 8 हजार रुपये रोख असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवविवाहित महिलांनी 1 वर्षासाठी प्रेग्नंसी पुढं ढकलावी; या सरकारचा अजब-गजब निर्णय 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास डॉ. नलिनी नाडकर्णी घरामध्ये एकट्या असताना तिघांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या गळ्याला धारदार कोयता लावून जीवे मारण्याची धमकी देत २५ तोळे सोने व रोख रक्कम लुटली होती. गुन्हा घडलेल्या ठिकाणी कोणताही पुरावा मिळू नये यासाठी आरोपींनी सर्व पुरावे नष्ट केले होते. त्यामुळे या प्रकरणी तपास करणे पोलिसांपुढे आव्हान होते. विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील हे तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, नलिनी नाडकर्णी यांच्या ओळखीची पायल पाटील होती. नाडकर्णी यांच्या घरी त्यांचे सारखे येणे-जाणे होते. पायल पाटील हिने तिचा मित्र निखिल पाटील याच्या सोबत कट रचून घरात दरोडा टाकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी पाचोरे, फोंडे आणि रोहित पाटील यांची मदत घेतली. त्यावरून नांद्रे, वसगडे, खटाव आणि सांगली येथे छापा टाकून पाच जणांना अटक केली. अमित चंद्रकांत पाचोरे (वय 28) सचिन शिवाजी फोंडे (वय २७, रा. नांद्रे) रोहित देवगोंडा पाटील (वय २३) निखिल राजाराम पाटील ( ३१)  आणि पायल युवराज पाटील (वय ३१, रा. सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत. तर पायल पाचोरे ही डॉ. नाडकर्णी यांच्या ओळखीची होती. पायल आणि तिचा मित्र निखिल यांनीच कट रचून दरोड्याचा गुन्हा घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अखेर ‘लंबी जुदाई’ संपली, पाकिस्तानात अडकलेल्या नववधूचा 3 वर्षांनी गृहप्रवेश पाच जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सर्वांनी मैत्रिणीच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली. या पाचही जणांकडून पोलिसांनी चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हा करण्यासाठी वापरलेले 5 मोबाईल, 4 मोटारसायकली व एक कोयता असा एकूण 7 लाख 42 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सांगली पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published: