बडोदा येथे ऑक्सिजनच्या कंपनीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

बडोदा येथे ऑक्सिजनच्या कंपनीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा होरपळून मृत्यू

गुजरातमधील वडोदरामध्ये एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्फोटाचं कारण समोर आलं नाही आ

  • Share this:

बडोदा,11 जानेवारी: गुजरातमधील बडोदा येथील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

मिळालेली माहिती अशी की, AIMS इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीत शनिवारी सकाळी भीषण स्फोट झाला. कर्मचारी काम करत असताना हा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. .

स्फोटाने हादरला परिसर

कंपनीत झालेल्या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. स्फोटानंतर मोठा आवाज झाला. आवाजामुळे संपूर्ण परिसर हादरला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोट इतका भयंकर होता की कंपनीचे छत उडून दूर फेकले गेले आहे. स्फोटानंतर कंपनीत भीषण आगही पसरली. त्यात 7 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. स्फोट झाला त्यावेळी कंपनीत अधिकारी नसल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळी फायरब्रिगेडच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. तसेच ७ रुग्णवाहिकाही दाखल झाल्या होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. स्फोटाचे कारण मात्र अजूनही समोर आले नाही.

मृतकांचा आकडा वाढण्याची भीती

कंपनीत ऑक्सिजन तयार करण्याचं काम सुरू असताना स्फोट झाल्याची माहिती आहे. स्फोटात काही लोक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: January 11, 2020, 4:43 PM IST

ताज्या बातम्या