मारेकरी 'माझ्या नवऱ्याचीच बायको..!', पहिलीने केला दुसरीवर आरोप

मारेकरी हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या नवऱ्याची बायकोच, असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 04:36 PM IST

मारेकरी 'माझ्या नवऱ्याचीच बायको..!', पहिलीने केला दुसरीवर आरोप

विजय कमळे पाटील, (प्रतिनिधी)

जालना, 24 जून- अंबड तालुक्यातील महाकाळा येथील हत्येला वेगळं वळण लागलं आहे. 2 बायका असलेल्या एका दादल्याचा प्रॉपर्टीच्या वादातून खून झाल्याची घटना सोमवारी पहाटे समोर आली. मारेकरी हा दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या नवऱ्याची बायकोच, असल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीने केला आहे.

काय आह हे प्रकरण?

अंबड तालुक्यातील महाकाळा गावात माणिक जिजा मुळे (वय-62) यांची हत्या झाली. माणिक मुळे यांची राहत्या घरातच रविवारी (23 जून) मध्यरात्री 2:30 ते 3 दरम्यान हत्या करण्यात आली. माणिक मुळे याला 2 बायका आहेत. तसेच एकही आपत्य नसल्याने ते आपली प्रॉपर्टी पुतण्याच्या नावावर करणार होते. यावरून दोन्ही बायकांनी त्यांच्याशी वाद घातला होता. या वादातून हे हत्याकांड झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गोंदी पोलिसांसह श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्स्पर्ट घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मारेकरी माझ्या नवऱ्याचीच बायको..!

Loading...

सोमवारी पहाटे माणिक मुळे यांचा मृतदेह राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. या हत्येप्रकरणी माणिक यांच्या पहिली पत्नी सत्यभामा मुळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मारेकरी हा दुसरा-तिसरा नसून माझ्या नवऱ्याची बायकोच असल्याचा खळबळजनक आरोपही सत्यभामा मुळे यांनी केला आहे. सत्यभामा यांनी दिलेल्या तक्रारावरून पोलिसांनी संशयित आरोपी शारदा हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

'मला मुलबाळ होत नसल्याने 17 वर्षांपूर्वी माझे पती माणिक मुळे यांनी बोलगाव (ता. घनसावंगी) येथील शारदा पवार हिच्याशी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या दोघींमध्ये पटत नसल्याने 2 महिन्यांपूर्वी मी माहेरी निघून गेले होते. शारदाच्या चारित्र्यावर संशय असल्याने आणि प्रॉपर्टी नावावर करण्यावरून पती माणिक आणि शरदामध्ये देखील वाद होत व्हायचे. दोघी पत्नींना मुलबाळ नसल्याने माणिक आपली प्रॉपर्टी पुतण्याच्या नावावर करणार होते. याच रागातून शारदा हिने डोक्यात वार करून माणिक यांचा खून केला असावा, असा आरोप सत्यभामा मुळे यांनी केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

'त्या' दिवशी मुथ्थुट फायनान्समध्ये तरुणाची कशी झाली हत्या? नांगरे पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 24, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...