मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

इस्त्रायलमध्ये सापडला 6000 वर्ष जुना मुलीचा सांगाडा; शास्त्रज्ञही चक्रावले

इस्त्रायलमध्ये सापडला 6000 वर्ष जुना मुलीचा सांगाडा; शास्त्रज्ञही चक्रावले

Skeleton of girl found in Israel: इस्त्रायलमध्ये 6000 वर्ष जुन्या (6000 year old Skeleton) एका लहान मुलीचा सापळा सापडला आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञही चक्रावले आहेत.

    तेल अवीव, 22 मार्च: जगाच्या प्राचीन इतिहासात आतापर्यंत अनेक लढाया झाल्या आहेत. त्याचबरोबर जुन्याकाळातील राजे, महाराजे किंवा योद्धे आपल्या शत्रूंना यमसदनी धाडल्यानंतर त्यांना एकत्र पुरत असतं. त्याकाळी अशा गोष्टी सामान्य होत्या. पण अशा गोष्टी आज आढळल्या तर अनेक धक्कादायक तथ्ये समोर येतात. अशातच इस्त्रायलमध्ये 6000 वर्ष जुन्या एका लहान मुलीचा सापळा सापडला आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञही चक्रावले आहेत. (6000 year old Skeleton of girl found in Israel) इस्त्रायल देशातील 'मृत्यूच्या गुहेत' एका मुलीचा 6000 वर्ष जुना सांगाडा सापडला आहे, ज्यामुळे वैज्ञानिकही आश्चर्यचकित झाले आहेत. संबंधित 'मृत्यूची गुहा' ही इस्रायलच्या जुदेआन वाळवंटातील मृत समुद्राला लागून आहे. याठिकाणी याआधी तब्बल 40 पुरुषांचे सापळे सापडले होते. त्यामुळे 1960 च्या दशकात या गुहेचं नाव 'मृत्यूची गुहा' असं ठेवण्यात आलं आहे. गुहेतील कोरड्या वातावरणामुळे संबंधित सापळ्याचं रुपांतर नैसर्गिकरित्या ममी मध्ये झाल्याचं आढळलं आहे. अगदी दोरीच्या साहाय्याने गुहेत उतरूनही या सांगाड्यापर्यंत पोहचता येतं. या मुलीच्या सांगाड्याचं सीटी स्कॅन केलं असता, या मुलीचं वय 6 ते 12 वर्षांच्या दरम्यान असल्याचं उघड झालं आहे. असं म्हटलं जात आहे की, हा सांगाडा एका मुलीचा आहे. कारण 6000 वर्षांनंतरही तिच्या कातडीचा आणि केसांचा काही भाग अद्याप बाकी आहेत. इस्त्रायली इतिहासकार रोनित लुपु यांनी सांगितलं की, ज्याने कोणी या मुलीला पुरलं आहे, त्याने या मुलीचा मृतदेह एका कपड्याने लपेटला होता. हे ही वाचा - पत्नीनं प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, घराचं काम करताना कामगारांना सापडला सांगाडा त्याचबरोबर मुलीच्या हातात एक विशेष कपडाही बांधला होता. हा सापळा मृत समुद्रात असलेल्या सूचना पत्राजवळ सापडला आहे. हे सूचना पत्र हिब्रू भाषेत लिहिलेलं असून हे सर्वात जुनं पत्र असल्याचं म्हटलं जात आहे. अलीकडे याठिकाणी 2000 वर्ष जुनी पत्रं सापडली होती. यहुदी भाषेत लिहिलेलं हे पत्र रोमविरूद्ध यहुद्यांच्या बंडाच्या वेळी लपवलं गेलं होतं. याठिकाणी जगातील सर्वात प्राचीन कटोरीही सापडली आहे, जी सुमारे 10 हजार वर्ष जुनी आहे. याव्यतिरिक्त याठिकाणी बाण आणि नाणी सापडली आहेत, ही नाणी कोचबा क्रांतीच्या काळातील असल्याचं म्हटलं जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Israel

    पुढील बातम्या