तयार रहा 5G येतंय; दूरसंचार विभागाने दाखवला हिरवा कंदील

रिलायंस जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या मिळून घेणार 5G ची ट्रायल

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 06:45 PM IST

तयार रहा 5G येतंय; दूरसंचार विभागाने दाखवला हिरवा कंदील

नवी दिल्ली, 7 मे : पुढल्या महिन्यात म्हणजेच जून-19 मध्ये भारतात 5G सेवेची ट्रायल घेतली जाणार आहे. ही सेवा प्रदान करू इच्छीणाऱ्या कंपन्यांना लायसन्स आणि स्पेक्ट्रम वाटप करण्यासाठी दूरसंचार विभागाच्या कमिटीने हिरवी झेंडी दिली आहे. एका वृत्तानुसार, दूरसंचार विभाग पुढल्या 10-15 दिवसातंच सॅमसंग, नोकिया आणि एरिक्सन या कंपन्यांना लायसन्स जारी करणार असल्याची माहिती आहे.

रिलायंस जिओ आणि सॅमसंग या दोन कंपन्या मिळून 5G ची ट्रायल घेणार आहेत. तसंच नोकिया आणि एयरटेल, एरिक्सन आणि वोडाफोन-आयडिया या कंपन्या मिळून 5G सेवेची ट्रायल घेणार आहेत. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेस पासून या ट्रायलला सुरूवात होईल. यासाठी सुरुवातीला फक्त तीन मिहिन्यांसाठीच ट्रायल लायसन दिलं जाईल. नंतर वर्षभरासाठी देण्याबाबत त्यावर विचार केला जाणार आहे.


5G चे असे आहेत फायदे -

5G सुरू झाल्यानंतर 3 तासाची HD मुव्ही 1 सेकंदात तुम्हाला डाउनलोड करता येईल. सद्याच्या घटकेला 4G वापरताना याच कामासाठी 10 मिनिटे लागतात. डेटा ट्रान्सफर करण्याची गती ही विद्युत वेगाच्या बरोबरीने राहणार असल्यामुळे व्हिडिओ बफरिंगसाठी अजिबात वेळ लागणार नाही. 5G सुरू होताच 1 मिलीसेकंदाद तुम्ही डेटा पाठवू शकाल. 4G नेटवर्क वापरताना यासाठी 70 मिलीसेकंद लागतात.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: 5g
First Published: May 7, 2019 06:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...