मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रायगडावर ट्रेकींगला गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी अंत; मुख्य प्रवेशद्वाराजवळच सोडला प्राण

रायगडावर ट्रेकींगला गेलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी अंत; मुख्य प्रवेशद्वाराजवळच सोडला प्राण

छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले रायगडावर चढाई (Raigad fort trekking) करत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी अंत (Tourist death) झाला आहे.

महाड, 13 डिसेंबर: छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले रायगडावर चढाई (Raigad fort trekking) करत असताना एका पर्यटकाचा दुर्दैवी अंत (Tourist death) झाला आहे. पायरी मार्गाने रायगडावर चढाई करत असताना, महादरवाजाजवळचं पर्यटकाला मृत्यूनं गाठलं आहे. रायगडावरील महादरवाजाजवळच पर्यटकाचा मृत्यू झाल्याने, शिवप्रेमींमध्ये आणि ट्रेकर ग्रुपमध्ये खळबळ उडाली आहे. ते चक्कर येऊन खाली कोसळल्यानंतर, त्यांच्या काही साथीदारांनी त्यांना तातडीनं महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं आहे. निळकंठ विराधवन असं मृत पावलेल्या 51 वर्षीय पर्यटकाचं नाव असून ते पनवेल येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत निळकंठ विराधवन हे 11 डिसेंबर रोजी आपल्या काही साथीदारांसोबत रायगडावर ट्रेकींग करण्यासाठी गेले होते. ते रायगडावर पायरी मार्गाने चढाई करत होते.

हेही वाचा-रायगडावर राख सदृश्य वस्तू घेऊन येणाऱ्या 'त्या' 4 तरुणांना अटक

दरम्यान ट्रेकींग करत असताना, महादरवाजाजवळच त्यांना चक्कर येऊन ते खाली कोसळले. या प्रकारानंतर त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने महाड ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी आणलं. पण याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी मृत निलकंठ विराधवन यांचे सहकारी शशीभूषण शुक्ला यांच्या फिर्यादीनुसार, आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. निलकंठ यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास महाड पोलीस करत आहेत.

हेही वाचा- हृदयद्रावक! राजगडावर चढाई करताना मृत्यूनं गाठलं; पुण्यातील पर्यटकाचा दुर्दैवी अंत

दुसरीकडे, 28 नोव्हेंबर रोजी राजगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पुण्यातील (Pune) एका ज्येष्ठाचा दुर्दैवी मृत्यू (tourist died while climbing rajgad fort) झाला होता. ही घटना ताजी असताना रायगडावर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. दिलीप बबनराव महामुनी असं राजगडावर मृत पावलेल्या 64 वर्षीय वयोवृद्धाचं नाव होत. मृत महामुनी हे पाषण परिसरातील सुतारवाडी येथील रहिवासी होते.

First published:

Tags: Raigad