मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /50 वॅगनची नववी 'जलराणी' मिरजेहून लातूरात दाखल

50 वॅगनची नववी 'जलराणी' मिरजेहून लातूरात दाखल

  latur Banner

  लातूर - 20 एप्रिल : 50 वॅगनच्या रेल्वेतून पाणी घेऊन निघालेली 'जलराणी' आज (बुधवारी) सकाळी साधारण आठच्या सुमारास लातूरला पोहोचली. रेल्वेने पाणीपुरवठ्याची आजची नववी खेप असून यातून एकूण 25 लाख लिटर पाणी लातूरमध्ये पोचलं आहे. तर लातूरला आतापर्यंत रेल्वेने 65 लाख लिटर पाणी मिळालं आहे.

  एकाच वेळी रेल्वेने एखाद्या शहरासाठी 25 लाख लिटर पाणी देण्याची ही देशातील पहिलच वेळ आहे. या पुढे दररोज 50 वॅगनने शहराला रेल्वेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. या रेल्वेतून आलेले पाणी रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या एका विहिरीत उतरवून घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते पाणी 15 टँकरद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेण्यात येत आहे.

  दरम्यान, दुष्काळग्रस्त लातूरला दिलेल्या मुदतीत पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन गेल्या काही दिवसांपासून कमालीचे प्रयत्न करत होते. सरकारी कामांचा अनुभव घेता रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी किमान 18 महिन्यांचा अवधी लागला असता. मात्र रेल्वेमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी लक्ष घातल्याने 18 महिन्यांचे काम अवघ्या 9 दिवसांत पूर्ण करण्याची किमया साधली आहे.


  बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

  Follow @ibnlokmattv


  First published:
  top videos