सिल्वासा बोट उलटून मुंबईतील पाच पर्यटकांचा मृत्यू

सिल्वासा बोट उलटून मुंबईतील पाच पर्यटकांचा मृत्यू

गुजरातच्या सिल्वासा इथल्या दुधनी तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील 5 पर्यटकांचा मृत्यू झाला. नजीकच्या एका गावात बोटीने जात असताना (काल) मंगळवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली.

  • Share this:

गुजरातच्या सिल्वासा इथल्या दुधनी तलावात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत मुंबईतील 5 पर्यटकांचा मृत्यू झाला. नजीकच्या एका गावात बोटीने जात असताना (काल) मंगळवारी संध्याकाळी ही दुर्देवी घटना घडली. बिपीन शाह, पन्नाबेन शाह, सुनिता कोठारी, पल्लवी शाह, विना कमल भोला अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

बोटीत एकूण 30 जण होते. हे सर्वजण दादरा-नगर हवेली इथे पर्यटनासाठी गेले होते. खानवेल गावातील एका रिसॉर्टमध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. रिसॉर्टच्या मालकीच्या बोटीने ते दुधनी तलावातून खानवेल गावाकडे चालले होते, असं स्थानिक अधिकारी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

रिसॉर्टच्या मालकाने नवीन बोट घेतल्यानंतर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला याठिकाणी बोलावले होते. या बोटीचा हा पहिलाच प्रवास होता. मात्र, दुर्देवाने ही बोट तलावात उलटली. बुडालेले सर्वजण मुंबईतील रहिवाशी असून यापैकी पाजणांचा मृत्यू झाला असून 19 जणांना वाचविण्यात यश आलं आहे. अद्यापही सहाजणांचा शोध सुरू आहे. या दुर्घटनेतून वाचलेल्यांवर सिल्वासातील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 29, 2017 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...