• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Building Collapsed: पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, पाहा LIVE VIDEO

Building Collapsed: पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, पाहा LIVE VIDEO

Building Collapsed in Jamalpur LIVE VIDEO: जमालपूर येथे एक पाच मजली इमारत अचानक कोसळली.

 • Share this:
  अहमदाबाद, 19 मे: गुजरातला तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला असताना आता दुसऱ्या दिवशी एक थरारक घटना घडली आहे. चक्रीवादळाचा तडाखा आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच आता अहमदाबाद (Ahmedabad)मध्ये एक पाच मजली इमारत कोसळली (Building collapsed) आहे. इमारत कोसळण्याची ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद (building collapsed caught in camera) झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियातही प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अहमदाबादमधील जमालपूर येतील काझीच्या ढाब्याजवळ एक पाच मजली इमारत आज अक्षरश: पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याचं पहायला मिळालं. इमारत कोसळल्याने सर्वत्र एकच गोंधळ उडाला. या इमारतीत अनेक कुटुंब राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून इमारत कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्या खाली अडकल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाहीये. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: