या ५ कारणांसाठी 'ठाकरे' सिनेमा एकदा पाहाच

एकीकडे सिनेमात बाळासाहोबांचं आयुष्य उलगडून दाखवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांना जुनं बॉम्ब (मुंबई) कसं होतं हेही पाहता येणार आहे.

  • Share this:

देशाला कळेल बाळासाहेब ठाकरे कोण होते- महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे कोण होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. मात्र या सिनेमातून महाराष्ट्रा बाहेरील इतर प्रेक्षकांना ठाकरे कोण होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द कळणार आहे.

देशाला कळेल बाळासाहेब ठाकरे कोण होते- महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे कोण होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. मात्र या सिनेमातून महाराष्ट्रा बाहेरील इतर प्रेक्षकांना ठाकरे कोण होते आणि त्यांची राजकीय कारकीर्द काय होती ते कळणार आहे.

नवाज ठाकरे शोभतो का- महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरे हे फक्त नाव नसून ती एक श्रद्धा आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ठाकरे यांची भूमिका नक्की कशाप्रकारे साकारतो ते एकदा पाहायलाच हवं.

सिनेमात काही वादग्रस्त विधान- बॉलिवूडमध्ये चरित्रपट तयार होतो तेव्हा शक्यतो दिग्दर्शक आपण संकटात सापडणार नाही अशापद्धतीनेच त्या सिनेमाची निर्मिती करतो. मात्र यावेळी बाळासाहेबांसारख्या झंझावाताचं आयुष्य सिनेमाच्या स्वरुपात दाखवायचं तर त्यात कॉन्ट्रोव्हर्सी असतीलच. नेमकी सिनेमात काही वादग्रस्त विधानं किंवा दृश्य आहेत का ते पाहण्यासाठी हा सिनेमा पाहायलाच हवा.

अमृता रावचं कमबॅक- खूप वर्षांनी अमृता सिनेमांमध्ये दिसून येत आहे. एवढ्या वर्षांनी अमृतांच्या चाहत्यांसाठी तिला मोठ्या पडद्यावर पाहणं ही ट्रीट असेल.

जुनं बॉम्बे (मुंबई)- एकीकडे सिनेमात बाळासाहोबांचं आयुष्य उलगडून दाखवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकांना जुनं बॉम्ब (मुंबई) कसं होतं हेही पाहता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2019 05:36 PM IST

ताज्या बातम्या