B'day Spl: ऑस्कर विजेत्या रेहमानची ही ५ गाणी ऐकली नाही तर तुम्ही काय ऐकलं

B'day Spl: ऑस्कर विजेत्या रेहमानची ही ५ गाणी ऐकली नाही तर तुम्ही काय ऐकलं

आज संगीतकार म्हणून नाव कमावलेल्या रेहमानला लहानपणी संगीत फारसं आवडत नव्हतं. संगीतात करिअर करण्याचा त्याचा कोणताच विचार नव्हता.

  • Share this:

संगीताच्या भाषेला कोणत्याही शब्दांची गरज नसतेअसं म्हणतात. अशा या संगीताच्या भाषेचा जादूगार, जगप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानचा आज वाढदिवस. रेहमानाने आपल्या संगीताने फक्त देशालाच नव्हे तर जगाला वेड लावलं आहे. तमिळ सिनेसृष्टीत संगीत म्हणजे इलायराजा हे समिकरण झालं होतं. ते तमिळ सिनेसृष्टीचे संगीतातले बादशहा होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. अशा वातावरणात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं अजिबात सोपं नव्हतं. मात्र ए.आर. रेहमानने आपली केवळ ओळखच निर्माण केली नाही तर तो संगीताचा बेताश बादशहा झाला.

रेहमानच्या जीवनाबद्दल लोकांना फारसं काही माहीत नाही. आज संगीतकार म्हणून नाव कमावलेल्या रेहमानला लहानपणी संगीत फारसं आवडत नव्हतं. तो रेडिओवर तमिळ संगीत ऐकायचा. मात्र संगीतात करिअर करण्याचा त्याचा कोणताच विचार नव्हता. रेहमान पाचवीत असताना वडिलांनी एक कीबोर्ड गिफ्ट दिला. तेव्हापासून त्याला संगीताची आवड निर्माण झाली.

ए.आर. रेहमानचं नाव कॅनडामध्ये ओंटारीयातील एका रस्त्याला देण्यात आले आहे. यावरुन त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो. रेहमान फक्त उत्तम संगीतकारच आहे असं नाही तर तो तेवढाच सुंदर गायकही आहे. त्याने आतापर्यंत अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. रेहमानच्या वाढदिवसानिमीत्त त्याची ही प्रसिद्ध पाच गाणी पाहुयात...

पिया हाजी अली, फिल्म का नाम- फिजा (2000)

जिक्र, फिल्म का नाम- बोस द फॉरगेटन हीरो (2004)

ख्वाजा मेरे ख्वाजा, फिल्म का नाम- जोधा-अकबर (2008)

अर्जिया, फिल्म का नाम- दिल्ली 6 (2009)

कुन फाया कुन, फिल्म का नाम- रॉकस्टार (2009)

First published: January 6, 2019, 12:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading