NDRF च्या टीमला जमलं नाही ते देशी जुगाडाने केलं; बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरडल्या असं काढलं बाहेर

NDRF च्या टीमला जमलं नाही ते देशी जुगाडाने केलं; बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरडल्या असं काढलं बाहेर

Rajasthan boy fall in borewell बोअरवेलमध्ये पडलेल्या या मुलाला बाहेर काढण्यासाठी NDRF ने अनेक तास प्रयत्न केले, मात्र अखेर स्थानिकांच्या जुगाडानेच मुलाला बाहेर काढता आलं.

  • Share this:

जालोर (राजस्थान) 07 मे : राजस्थानमधल्या (Rajsthan) लाछडी गावामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या (Boy fall in borewell) चिमुरड्याला रात्री उशिरा बाहेर काढण्यात यश आलं. विशेष म्हणजे NDRF च्या टीमने अनेक तास प्रयत्न करूनही त्यांना मुलाला बाहेर काढता आलं नाही. पण गावातील माधाराम (Madharam) नावाच्या एका व्यक्तीनं देशी जुगाड (Desi Jugad) करत या मुलाला बाहेर काढलं. त्यामुळं त्याचं कौतुक केलं जात आहे.

(वाचा-केवळ 35 ते 45 वयोगटातील नागरिकांचं होणार लसीकरण! सरकार आज निर्णय घेणार)

लाछडी या गावामध्ये नगाराम देवासी यांच्या शेतात नवीन बोअरवेल खोदण्यात आली होती. ही बोअरवेल पूर्ण झालेली नव्हती त्यामुळं तिला वरून झाकण्यात आलं होतं. गुरुवारी सकाळी सुमारे सव्वा दहाच्या सुमारास नगाराम यांचा 4 वर्षांचा मुलगा अनिल हा खेळता खेळता या बोअरवेलमध्ये डोकवायला लागला. यादरम्यान त्याचा तोल घसरला आणि तो आत पडला. जवळच उभ्या असलेल्या एका नातेवाईकाने त्याला पडताना पाहिलं आणि त्यानं आरडा-ओरडा केल्यानं लोक जमा झाले.

(वाचा-आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला फटकारलं)

अनिल जवळपास 90 फुटांवर अडकला होता पण तो वरून दिसत होता. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. बोअरवेलमध्ये कॅमेरा टाकण्यात आला. मुलगा सुखरुप होता. त्यानंतर त्याला पाण्याची बाटली देण्यात आली तर त्यानं पाणीही पिलं. स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याला 10 फुटांपर्यंत वर खेचण्यात यशही आलं होतं, पण तो घसरला आणि खाली पडला. त्यानंतर म्हणजे घटनेच्या जवळपास 8 तासांनंतर NDRF ची टीम आली, आणि त्यांनी बचाव मोहीम सुरू केली.

अजमेर आणि गांधीनगरहून आलेल्या NDRF च्या टीमनेही अनेक तास प्रयत्न केले पण त्यांना मुलाला बाहेर काढण्यात यश आलं नाही. या दरम्यान मुलाच्या कुटुंबीयांनी गावातील स्थानिक व्यक्ती माधारामची या कामात मदत घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला होकार दिल्यानंतर माधाराम यांच्या जुगाडाच्या मदतीनं मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. रात्री उशिरा सुमारे 1 वाजून 55 मिनिटांनी त्यांनी बचान मोहीम सुरू केली आणि 2 वाजून 20 मिनटांनी मुलाला बाहेर काढण्यात यश आलं.

माधाराम यांनी एक विशिष्ट प्रकारचा सापळा तयार करून आत सोडला आणि त्याच्या मदतीनं त्यांनी मुलाला बाहेर काढलं. मुलगा बाहेर निघताच सर्वांनी जल्लोष केला. माधाराम यांच्या या तंत्राचं तिथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच कौतुक केलं. मुलाला काही किरकोळ जखमा झाल्या मात्र मुलगा आता सुखरुप असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 7, 2021, 7:39 PM IST
Tags: rajsthan

ताज्या बातम्या