नदीकडे बघून आवरला नाही पोहण्याचा मोह; नागपूरच्या चौघांचा वाकीच्या नदीत बुडून मृत्यू

अतिउत्साह नागपुरातील चार जणांच्या जीवावर बेतला आहे.

अतिउत्साह नागपुरातील चार जणांच्या जीवावर बेतला आहे.

  • Share this:
    नागपूर, 22 जून : नुकतंच कोरोना लॉकडाउन (Corona lockdown) सरकारकडून शिथिल करण्यात आलं आहे. त्यात पावसाळा (Rainy season) सुरु झाल्यामुळे सर्व ठिकाणी रमणीय वातावरण आहे. त्यामुळे तरुणाईमध्ये बाहेर फिरायला (short trips near Nagpur) जाण्याचा जोश आला आहे. मात्र हाच अतिउत्साह नागपुरातील चार जणांच्या जीवावर बेतला आहे. नागपूरजवळच्या (Nagpur) वाकीजवळ (Waki woods) कन्हान नदीत (Kanhan river) बुडून चौघांचा मृत्यू  (4 drown in waki woods) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाकी हे ठिकाण ताजुद्दीन बाबांच्या दर्ग्यासाठी (Waki Dargah) प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी नेहमीच असते. या दर्ग्यापासून काही अंतरावर द्वारका वॉटर पार्क नावाचं एक ठिकाण आहे. या ठिकाणी नागपुरातील आठ जण आले होते. मात्र हे वॉटर पार्क बंद असल्यामुळे त्यांची निराशा झाली. या वॉटर पार्कजवळून कन्हान नदी वाहते. या ठकाणी नदीत मोठे डोह आहेत. हे वाचा - धावत्या ट्रेनमधून चिमुकली पडली खाली; मुलीला वाचवण्यासाठी आईनं केलं जीवाचं रान मिळालेल्या माहितीनुसार वॉटर पार्क बंद बघून हे आठही जण नदीच्या दिशेनं गेले. पावसाळ्यामुळे नदीला भरपूर पाणी बघून यापैकी काही जणांना पोहण्याचा मोह आवरला नाही. यापैकी चार जण नदीत उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी इतर जण गेले मात्र त्यांना यश आलं नाही. आठ जणांपैकी चार जणांचा बुडून मृत्यू झाला. या आधीही झाले आहेत मृत्यू वाकीच्या या नदीमध्ये अनेक डोह असल्यामुळे या आधीही इथे अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या नदीजवळ कोणीही जाऊ नये म्हणून गावकऱ्यांनी इथे सूचनेचा फलकही लावला आहे. तसंच नदीजवळ जाण्याच्या रस्त्यात मोठा खड्डाही खोदण्यात आला आहे. असं असूनही हे सर्वजण नियम तोडून नदीपर्यंत गेले. यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकाचा आढळला मृतदेह माहिती मिळताच खापा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांच्या मदतीने चारही मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. गोताखोरांना फक्त एका युवकाचा मृतदेह आढळून आला.आहे. इतर तिघांचे मृतदेह शोधण्याचं कार्य सुरू आहे. त्यात परिसरात पाऊस सुरु असल्यामुळे अडचणी येत आहेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published: