नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांबाबत खळबळजनक प्रकार समोर, आरोग्य प्रशासन हादरलं

नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांबाबत खळबळजनक प्रकार समोर, आरोग्य प्रशासन हादरलं

30 एप्रिल रोजी लंगरसाहिबच्या 97 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या होत्या. त्यातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते.

  • Share this:

नांदेड, 04 मे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांबद्दल योग्य ती खबरदारी घेण्यासाठी आरोग्य प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. पण,  नांदेडमध्ये चार कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागत नसल्याने खळबळ उडाली आहे.

30 एप्रिल रोजी लंगरसाहिबच्या 97 कर्मचाऱ्यांच्या तपासण्या झाल्या होत्या. त्यातील 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. मात्र, तपासणीला नमुने देऊन हे 20 ही जण गायब झाले होते. पोलिसांनी मोठी शोधाशोध करत यातील 16 जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील उर्वरित चौघांचे केवळ नावेच उपलब्ध आहेत. त्यामुळे या चौघांचा अद्याप शोध लागत नाही.

हेही वाचा - ...तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा

या मंडळींचे तपासणीसाठी नमुने घेतल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. मात्र, रुग्णालयात नेणे तर सोडाच पण या लोकांचे साधे पत्ते, संपर्क नंबर देखील घेण्याची तसदी आरोग्य विभागाने घेतलेली नाही.

एकीकडे कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सरकार प्रचंड प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेला याचे गांभीर्य नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तर या प्रकारामुळे नांदेडमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.

हेही वाचा - 'लुडोला दिली ओसरी...' सुबोध भावेनं शेअर केलेल्या फोटोची काय आहे भानगड!

दरम्यान, नांदेडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात आतापर्यंत  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची 31 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू  झाला आहे.  सध्या 28 जणांवर उपचार सुरू आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 4, 2020, 11:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading