मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /सेल्फी काढताना रोहित पाण्यात पडला, त्याला वाचवण्यास दोघांनीही घेतली उडी, धुळ्यातील धक्कादायक घटना

सेल्फी काढताना रोहित पाण्यात पडला, त्याला वाचवण्यास दोघांनीही घेतली उडी, धुळ्यातील धक्कादायक घटना


 हे सर्व विद्यार्थी मायक्रो बायोलॉजी शाखेत शिक्षण घेत होते.

हे सर्व विद्यार्थी मायक्रो बायोलॉजी शाखेत शिक्षण घेत होते.

हे सर्व विद्यार्थी मायक्रो बायोलॉजी शाखेत शिक्षण घेत होते.

     

    धुळे, 23 जून : धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गाला लागून असलेल्या लळींग कुरणातील धबधब्याजवळ  सेल्फी काढण्याच्या नादात तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धबधबा समोर फोटो काढत असताना एका तरुणाचा पाय घसरला त्या पाठोपाठ इतर दोन तरुणही पाण्यात बुडाले. घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड केल्यावर झालेला  प्रकार समोर आला. या तरुणांना बाहेर न पडता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

    धुळे शहरातील सहा मित्र दुचाकीने लळींग कुरणातील धबधब्याजवळ वन पर्यटनासाठी गेले होते. यावेळी सेल्फी काढण्यासाठी सर्व मित्र संरक्षक कठडे ओलांडून खाली उतरले. दरम्यान धबधब्याच्या पायथ्याशी उतारावर मोबाईलवर सेल्फी काढताना रोहितचा पाय घसरला व तो धबधब्याच्या डोहात पडला. यावेळी सोबत असलेल्या दोघा मित्रांनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, ते तिघेही बघता बघता पाण्यात खोलवर बुडून गेले. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करत वन कर्मचाऱ्यांना घटनेची महिती दिली.

    'कृष्णकुंज'ला कुणाची चिथावणी होती? विखे पाटलांचे राऊतांना जशास तसे उत्तर

    घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी धुळे एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी SDRF च्या जवानांच्या मदतीने मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    हे सर्व विद्यार्थी मायक्रो बायोलॉजी शाखेत शिक्षण घेत होते. या दुर्दैवी दुर्घटनेत शुभम अनिल चव्हाण, शुभम प्रेमराज पाटील आणि रोहित कोमल सिंग गिरासे या तिघां मित्रांचा दुर्दैवी मृत्यू  झाला आहे.

    कोरोना पॉझिटिव्ह असून नर्सनं दिली परीक्षा, मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक

    लळींग हे पर्यटनस्थळ असल्याने इथं धुळ्यासह परिसरातील पर्यटक पर्यटनासाठी मोठ्या संख्येनं येत असतात. पावसाळ्यात येथील धबधब्याचे विहंगमदृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यातच काही तरुणांना पोहण्याचा व सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. धबधब्याचा डोह खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे येथे दुर्घटना घडतात. लळींग येथील धबधब्यात पावसाळ्यात पोहण्यासाठी अनेक तरुण जात असतात. यापूर्वीही पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याचे घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने येथे सुरक्षेची व्यवस्था करण्याची वेळोवेळी मागणी होत आहे.

    संपादन - सचिन साळवे

    First published:
    top videos

      Tags: Dhule news, Selfie