‘जेईई’मध्ये महाराष्ट्रातील तिघांना 100 पर्सेटाइल

‘जेईई’मध्ये महाराष्ट्रातील तिघांना 100 पर्सेटाइल

राज्यातील तीन विद्यार्थ्यांनी 100 पर्सेटाइलसह देशातील पहिल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले.

  • Share this:

मुंबई, 20 जानेवारी: देश पातळीवर घेण्यात आलेल्या जेईई मुख्य या सामायिक प्रवेश परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थ्यांनी 100 पर्सेटाइलसह देशातील पहिल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले. यात मुंबईचा अंकित कुमार मिश्रा, कार्तिकेय चंद्रेश गुप्ता आणि पुण्याचा राज आर्यन यांचा समावेश आहे.

आयआयटी आणि केंद्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी यंदा प्रथमच नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी देशभरातून 9 लाख 29 हजार 198 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तर प्रत्यक्षात 8 लाख 74 हजार 469 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  या वर्षी प्रथमच निकालात पर्सेटाइल पद्धत वापरण्यात आली होती.

देशातील १५ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेटाइल मिळाले. यात तेलंगणातील 4, महाराष्ट्रातील 3, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील प्रत्येकी 2 तर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबमधील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेत पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे.

First published: January 20, 2019, 4:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading