Home /News /news /

SEBI कडून Delhivery, Radiant आणि Veranda Learning या तीन आयपीओंना मंजुरी

SEBI कडून Delhivery, Radiant आणि Veranda Learning या तीन आयपीओंना मंजुरी

Delhivery, Radiant Cash Management Services आणि Veranda Learning Solutions यांना त्यांच्या IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाली आहे.

    मुंबई, 18 जानेवारी : SEBI कडून आणखी 3 कंपन्यांना IPO साठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. Delhivery, Radiant Cash Management Services आणि Veranda Learning Solutions यांना त्यांच्या IPO साठी SEBI कडून मंजुरी मिळाली आहे. Delhivery IPO डिटेल Delhivery या भारतातील लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन स्टार्टअपने नोव्हेंबरमध्ये SEBI कडे IPO साठी अर्ज दाखल केला होता. IPO मध्ये 5000 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 2460 कोटींची ऑफर फॉर सेल असेल. या ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीचे प्रमोटर आणि भागधारक त्यांचे शेअर्स विकतील. Carlyle आणि SoftBank या खाजगी इक्विटी कंपन्या या IPO मधील त्यांचा आंशिक हिस्सा विकतील. Carlyle ने नोव्हेंबर 2017 मध्ये Delhivery कंपनीत पहिल्यांदा गुंतवणूक केली. या IPO च्या ऑफर फॉर सेलमध्ये carlyle 920 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. याशिवाय चायना मोमेंटम फंडाच्या मालकीचा Fosun Group या आयपीओमध्ये 400 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे, तर सॉफ्टबँक रुपये 750 कोटी आणि टाइम्स इंटरनेट 330 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार आहे. Investment Options : यावर्षी 'या' तीन पद्धतीने चांगले पैसे कमवले जाऊ शकतात; चेक करा गुंतवणुकीचे पर्याय IPO मधून मिळणारी रक्कम कंपनीच्या ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक वाढीसाठी वापरली जाईल. या IPO मधील 1,250 कोटी रुपये अधिग्रहण आणि इतर व्यवसाय विस्तार योजनांसाठी वापरले जातील. कोटक महिंद्रा कॅपिटल, मॉर्गन स्टॅनले इंडिया, BofA सिक्युरिटीज इंडिया, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स हे या IPO चे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. Radiant Cash Management IPO डिटेल्स रेडियंट कॅश मॅनेजमेंटने ऑक्टोबर 2021 मध्ये आयपीओसाठी अर्ज दाखल केला होता. या IPO मध्ये 60 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 3.013 कोटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल असेल. IPO मधून मिळणारे पैसे कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि 220 खास बनावटीच्या आर्मर्ड व्हॅन्स खरेदी करण्यासाठी वापरले जातील. लक्षणीय बाब म्हणजे, रेडियंट कॅश मॅनेजमेंट ही एकात्मिक कॅश लॉजिस्टिक कंपनी आहे. रिटेल कॅश मॅनेजमेंट सेगमेंटमध्ये कंपनीची मजबूत पकड आहे. नेटवर्क स्थानाच्या बाबतीत ही या विभागातील सर्वात मोठी कंपनी आहे. कमी गुंतवणुकीसह डबल फायदा, LIC ची खास योजना; मॅच्युरिटीवर मिळेल 110 टक्के रिटर्न Veranda Learning Solutions IPO डिटेल्स Veranda Learning Solutions हे ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे. कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये SEBI कडे IPO चा ड्राफ्ट पेपर दाखल केला होता. IPO च्या माध्यमातून 200 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. IPO मधून मिळणारी रक्कम कंपनीचे कर्ज फेडण्यासाठी आणि Edureka च्या अधिग्रहणावर झालेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी वापरली जाईल. Veranda Learning Solutions विद्यार्थी, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना विविध प्रकारचे शिक्षण उपाय प्रदान करते. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, कंपनी विविध राज्यांतील लोकसेवा आयोग, स्टाफ सेलेक्स कमिशन, बँकिंग, विमा, रेल्वे आणि CA ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग सुविधा देखील पुरवते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या